spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मराठवाड्यात पावसाचं थैमान, १४ कुटुंबांचे केलं स्थलांतर

गेल्या काही दिवसांपासून कोकणासह मराठवाड्यात पावसाने थैमान घातले आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, पुलांवर पाणी साचल्याचे दिसून येत आहे.

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह मराठवाड्यात पावसाने थैमान घातले आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, पुलांवर पाणी साचल्याचे दिसून येत आहे. नांदेड आणि शेजारच्या हिंगोली जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे असना नदीला पूर आला आहे. मागील २४ तासापासून नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना पूर आला आहे.

सकाळ पासून पासदगाव जवळच्या असना नदीवरून पुराचे पाणी जात असल्याने नांदेड ते वसमत हा मार्ग बंद करण्यात आला होता. त्याच बरोबर अर्धापुर तालुक्यातील मेंढला नाल्याला पूर आल्याने या पुराचे पाणी अनेक गावात शिरले आहे.असना नदी आणि मेंढला नाल्याच्या पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अस्मानी संकटाचा सामना करावा लागला आहे. नांदेड ते नागपूर महामार्गावर असलेल्या असना नदीच्या पुलापर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे.

मुळशी तालुक्यात गुटके गावात जमीन खचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून मुळशी तालुक्यातील गुटके गावातील १४ कुटुंबांना दरीतील मोकळ्या जमिनीवर बांधलेल्या तात्पुरत्या निवासी इमारतींमध्ये स्थलांतरित केले आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीसह व्यक्ती आणि जनावरांच्या स्थलांतराचे निरीक्षण केले. वस्तीच्या वरच्या जागेत मोठ्या जागेवर १ फूट सरकला असल्याचे गेल्या वर्षी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. अधिक अभ्यास केल्यावर असे आढळून आले की तेथे जमीन सरकली आहे.

हेही वाचा : 

अभिनेता मंगेश देसाईच्या गाडीला भीषण अपघात, सुदैवानं कोणतीही जीविहानी नाही

Latest Posts

Don't Miss