spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Raj Thackeray यांच्या ‘त्या’ व्यक्तव्यावरून मराठा आंदोलक आक्रमक; थेट समोरासमोर बसून केली चर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने मराठवाडा दौऱ्यावर असून काल (सोमवार, ५ ऑगस्ट) सोलापूर येथे पत्रकार परिषदेत ‘महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यात मोठा गदारोळ होऊन मराठा समाज आक्रमक झाला होता. धाराशिव येथे मुक्कामी असताना राज ठाकरे यांनी सोलापूर येथे केलेल्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) विषयी वक्तव्यावर मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत ते थांबलेल्या हॉटेलमध्ये जोरदार घोषणाबाजी केली व मराठा आरक्षणाविषयी आपली काय भूमिका आहे हे स्पष्ट करावे अशी मागणी केली. बराच वाद झाल्यानंतर राज ठाकरे आणि आंदोलकांमध्ये चर्चा झाली.

यावेळी आरक्षणाविषयी बोलताना महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात आल्यानंतर कुठल्याही समाजाला आरक्षणाची गरज भासणार नाही. असे माझे मत असून मराठा आरक्षणाविषयी माझी काय भूमिका आहे. हे मी तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर उद्या सांगेल, असे राज ठाकरे यांनी आंदोलकांना म्हटले. तर राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने आरक्षणाची मागणी करतात. त्यास पाठिंबा न दिल्यास त्यांना मराठवाड्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीने जाब विचारला जाईल असे मत आंदोलकांनी मांडली.

बैठकीत काय म्हणाले राज ठाकरे?

आंदोलकांशी चर्चा करत यावेळी राज ठाकरे म्हणाले, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यावेळी मी तिथे आलो होतो. मी त्यांना सांगितले तुम्ही जी मागणी करत आहात ती पूर्ण होणार नाही. त्यांना फक्त तुमची माथी भडकवायची आहेत. संघर्ष घडवून मते मिळवणे एवढेच पाहिजे. तुम्ही नंतर वार्यावर गेलात तरी चालेल. हे राज्य अजया हातात आलं तर महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज पडणार नाही. आपली मराठी मुलंमुली, आपला शेतकरी यांच्यावर पैसा खर्च व्हायला हवा. तो नको त्या गोष्टींवर खर्च केला जातोय. पूल बंधले जातायत. ते कोणासाठी बांधले जातायत? कोण लोकसंख्या वाढवतंय महाराष्ट्रात? जे पैसे महाराष्ट्रावर आणि तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजे तो फक्त चार शहरांमध्ये खर्च केला जात आहे. शहरातील लोकसंख्या वाढीमुळे पैसे तिथेच खर्च होत आहे. जो तुमच्यासाठी खर्च व्हायला पाहिजे होता. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रातील लोकांना नोकरीसाठी घेणार नाहीत असं म्हणतात. शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत हेच माहित नसते. आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत. हे आपल्या मुलांना माहित नाही. नोकर्या महाराष्ट्रात असतात आणि जाहिराती युपी आणि बिहारमध्ये असतात. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला सर्व अंदाज येईल. जरांगे पाटलांनाही सर्व अंदाज येईल. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. महाराष्ट्रासारखं प्रगट राज्य आहे. इथल्या मुलांना शिक्षण आणि रोजगार यांच्यासारख्या संधी कुठेच उपलब्ध होत नाहीत. महाराष्ट्रात सर्व काही आहे. म्हणूनच बाहेरच्या राज्यातील लोक इथे येतात. तुमच्या तोंडाला पानं पुसतात आणि स्वार्थ साधतात, त्यांच्यापासून सावध राहा.”

हे ही वाचा:

Uddhav Thackeray यांचा आज दिल्ली दौरा होणार सुरु; दरम्यान भेटणार ‘या’ महत्वाच्या नेत्यांना

आमदार अपात्रतेबाबत Supreme Court मध्ये होणार सुनावणी ; दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss