Raj Thackeray: राज ठाकरेंवर येणार बायोपिक? काय म्हणाले मनसे अध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत नुकताच 'अथांग' (Athang) या मराठी वेब सीरिजचा ट्रेलर लॉंच झाला.

Raj Thackeray: राज ठाकरेंवर येणार बायोपिक? काय म्हणाले मनसे अध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत नुकताच ‘अथांग’ (Athang) या मराठी वेब सीरिजचा ट्रेलर लॉंच झाला. ट्रेलर लॉंच दरम्यान मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने (Actress Tejaswini Pandit) राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. तेजस्विनीने राज ठाकरेंना प्रश्न विचारला,”तुमच्यावर बायोपिक निघाला तर तुमची भूमिका कोणी साकारलेली तुम्हाला पाहायला आवडेल?

‘अथांग’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजमध्ये कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. निवेदिता जोशी सराफ, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, भाग्यश्री मिलिंद, शशांक शेंडे, योगिनी चोक, रसिका वखारकर आणि धैर्य घोलप हे कलाकार या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांना “तुमच्या स्वतःच्या आयुष्यात एवढा ड्रामा आहे, त्यात राजकारण आहे, लव्हस्टोरी आणि आयुष्यातले इतर चढउतार आहेत तर मग तुमच्यावर जर बायोपिक निघाला तर तुमची भूमिका कोणी साकारलेली पाहायला तुम्हाला आवडेल?” असा प्रश्न विचारला. ज्यावर राज ठाकरे यांनी फारच मजेदार उत्तर दिलं. पहिलं ‘बायको-पिक’ला विचारावं लागेल’ अशी कोटी राज ठाकरेंनी केली. राज ठाकरे यांचं उत्तर ऐकल्यानंतर तेजस्विनीलाही हसू आवरेनासं झालं. पुढे यावर उत्तर देत राज ठाकरे म्हणाले,”तसं काही असेल तर करा. माझी काहीच हरकत नाही. पण काही नसेल तर कशाला उगाच बनवायचं काही”.

मी जेव्हा सलूनमध्ये जायचो, तेव्हा माझं बाजूच्यांकडे लक्ष असायचं, ते आरशात पाहायचे, त्यांच्या स्वतःच्या दिसण्याबद्दल काही कल्पना असतात. पण मी कसा दिसतो, हे मला माहिती नाही, त्यामुळे कोण करु शकेल हे सांगू शकत नाही. पण काही असेल तर करा, उगाच कशाला? आता ही लव्ह स्टोरी कुठून काढलीत माहिती नाही, असं राज ठाकरे म्हणताच, ‘अहो बायकोसोबतचीच लव्ह स्टोरी’ असं उत्तर तेजस्विनीने दिलं. त्यावर ‘हट् तेच होतं, मी म्हटलं अशी कुठली गोष्ट आहे जी मला माहिती नाही, तुम्हाला माहित आहे’ असं म्हणत राज ठाकरेंनी खसखस पिकवली.

राज ठाकरे पुढे म्हणाले,”गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात बायोपिक येत आहे. पण जर सर्वोत्कृष्ट बायोपिक कोणाचा होऊ शकत असेल तर तो इंदिरा गांधी यांचा आहे. कारण त्यांचा संपूर्ण प्रवास हा रोलरकोस्टर राइडसारखा आहे. बायोपिक करताना योग्य व्यक्तीची निवड होणं गरजेचं आहे. आतापर्यंत आलेल्या बायोपिकपैकी ‘गांधी’ हा मला वाटतं सर्वोत्कृष्ट बायोपिक आहे”.

मराठी सिनेमे, वेबसीरिज प्रेक्षकांपर्यंत का पोहोचत नाहीत यावर उत्तर देत राज ठाकरे म्हणाले,”मला सिनेमा पाहायला आवडतं. पण मी तज्ज्ञ नाही. माझ्या घरामध्ये एक ड्रोबो नावाचं मशीन आहे. या ड्रोबो मशिनमध्ये साडेआठ ते पावणेनऊ हजार चित्रपट आहेत. हे सर्व सिनेमे मी पाहिले आहेत.” तसेच पुढे ते म्हणाले, आम्ही ज्या क्षेत्रात आहोत, तिथे कोणाचा थांग लागत नाही, आणि डायरेक्ट अथांगलाच आलो मी, असं म्हणत राज ठाकरे यांनी हलक्या फुलक्या वातावरणात संवादाला सुरुवात केली. मराठी घरात ओटी भरायची पद्धत आहे, ओटीटी भरायची नाही, त्यामुळे या ओटीटी प्लॅटफॉर्मचं कौतुक असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा : 

आजोबा, वडील किंवा काकांपासून जे संस्कार मिळाले, त्यामुळे मी अत्यंत हार्डकोअर, कट्टर मराठी आहे; राज ठाकरे

वरून सरदेसाईंच्या मनधरणीमुळे युवासेनेच्या ३५ पदाधिकाऱ्यांनी घेतलं राजीनामा माघे

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version