शाळेच्या पिकनिकमध्ये केली राज ठाकरेंनी एन्ट्री

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President President Raj Thackeray) यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे. राज ठाकरे यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे परळी कोर्टाने राज ठाकरे यांना अटक वॉरंट बजावलं होतं.

शाळेच्या पिकनिकमध्ये केली राज ठाकरेंनी एन्ट्री

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President President Raj Thackeray) यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे. राज ठाकरे यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे परळी कोर्टाने राज ठाकरे यांना अटक वॉरंट बजावलं होतं. परंतु अखेर आज परळी कोर्टाने राज ठाकरे यांच्या विरोधातील अटक वॉरंट हे रद्द केले आहे. यासोबतच त्यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. प्रत्यक्ष हजर राहिल्यानंतर त्यांनी आपल्याविरुद्धचं वॉरंट रद्द करण्याची विनंती केली. त्यानंतर कोर्टाने दंड ठोठावून त्यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट रद्द केलं आहे. अवघ्या ५ ते ७ मिनिटांत ही प्रक्रिया पार पडली. त्यानंतर राज ठाकरे हे पुन्हा मुंबईला रवाना झाले आहेत. दरम्यान मुंबईहून परळीला आणि परळीहून मुंबईला जातांना राज यांचे हेलिकॉप्टर इंधन भरण्यासाठी औरंगाबादमध्ये थांबले होते. मात्र याचवेळी मुंबईला परत जातांना औरंगाबादमध्ये थांबलेल्या राज ठाकरेंनी एका शाळेच्या सहलीतील मुलांशी संवाद साधला. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत फोटोही काढला.

परळी येथील न्यायालयात हजेरी लावल्यानंतर राज ठाकरे पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईकडे निघाले होते. दरम्यान त्यांनी मुंबईकडे जातांना औरंगाबादमधील पळशी येथील रिसॉर्ट थांबा घेतला. त्यानंतर ते मुंबईकडे निघण्यासाठी निघाले असतानाच तिथे एका शाळेची सहल आलेली होती. यावेळी शिक्षक आणि विध्यार्थी यांनी राज ठाकरे यांना पाहून एकच आनंद व्यक्त केला. तर मुलांचा उत्साहा पाहून राज ठाकरे कारमधून जाण्याचे टाळत शालेय मुलांमध्ये सहभागी झाले. तसेच शाळकरी मुलांशी संवाद देखील साधला. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत फोटो काढला.

आज सकाळच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे परळीत दाखल झाले आहेत. परळीत पोहोचतात त्यांनी पांगरी येथील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतलं आहे. यादरम्यान माध्यमांशी बोलण्यास ठाकरे यांनी नकार दिलाय. यावेळी औरंगाबादमध्ये राज ठाकरे हे हेलिकॉप्टरने आले आणि तिथून पुढे त्यांनी गाडीने प्रवास केला. यावेळी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्यातही हुर्डा पार्टीचे आयोजन करण्यात आलं होत. तसेच पुढे परळीमध्ये राज ठाकरे यांचं धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत केलं आहे. राज ठाकरे यांच्या साठी तब्बल ५० फुटांचा हार देखील बनवण्यात आला. गोपीनाथ गड ज्या पांगरी ग्रामपंचायतच्या अंतर्गत येतं त्या पांगरी गावचे सरपंच सुशील कराड यांनी हा हार बनवला आहे. कराड यांच्याकडून राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुशील कराड हे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. तसेच राज ठाकरे यांच्या गाडीवर JCB मधून फुलांची उधळणं करत स्वागत केलं आहे. ढोल ताशाचा गजर, फुलांची उधळणं करत त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. तसेच या वेळी राज ठाकरे हे गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले आहेत.

नेमके प्रकरण काय ?

राज ठाकरे यांना ऑक्टोबर २००८ साली मुंबईत अटक झाली होती. राज ठाकरे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी परळीच्या धर्मपुरीत बसेसवर प्रचंड दगडफेकही केली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू झाली होती. ३ आणि १२ जानेवारी रोजी राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं.परंतु राज ठाकरे हे कोर्टात हजर राहिले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी दोषारोप पत्रही कोर्टात सादर केलं आहे. मात्र राज ठाकरे प्रत्येक तारखेला गैरहजर राहिल्याने अखेर त्यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं होतं.

हे ही वाचा:

शुभमन गिलने ठोकली षटकारांची हॅट्रिक, न्यूझीलँड संघासमोर ठेवले ३५० धावांचे लक्ष्य

Ukrain Russia War कीवमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात, युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह १८ जणांचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version