spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पाकिस्तानी चित्रपट होणार भारतात रिलीज; Raj Thackeray यांचा थिएटरमालकांना धमकीवजा इशारा

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Fawad Khan) आणि अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) यांचा चित्रपट ‘लिजंड ऑफ मौला जट’ (Legend of Maula Jatt) लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. याबाबत आता मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोठी भूमिका घेतली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच थिएटर मालकांना धमकीवजा इशारा देत सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित केल्यास हे औदार्य महागात पडेल असे विधानही त्यांनी केले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून यावर भाष्य करत हा चित्रपट देशभरात प्रदर्शित न करण्याचे आवाहन राज्य सरकारांना केले आहे. बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न असून महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, यावर त्यांनी आपली ठाम भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे ट्विटरवर पोस्ट करत म्हणाले, “फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? आणि कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरु आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे.अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की.”

“या आधी असे प्रसंग जेंव्हा आले होते तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा प्रदर्शित करण्याच्या भानगडीत पडू नका. हा सिनेमा जेंव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही. आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार. आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे. त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये. कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे.”

हे ही वाचा:

लोकशाही आणि लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांवरून Sanjay Raut यांचा महायुती सरकारवर निशाणा

Raj Thackeray Vision Worli: Sandeep Deshpande हा राजकीयदृष्ट्या जागृत आणि अभ्यासू मुलगा, तो आमचा हिरा! ठाकरेंकडून देशपांडेंचे कौतुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss