विधानसभा निवडणुकीपूर्वी Raj Thackeray हे शिवसेना पक्षप्रमुख होतील, Prakash Ambedkar यांचे मोठे विधान

विधानसभा निवडणुकीपूर्वी Raj Thackeray हे शिवसेना पक्षप्रमुख होतील, Prakash Ambedkar यांचे मोठे विधान

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठे भाकीत केले असून ‘विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) हे शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख होतील,’ असे विधान त्यांनी केले. प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात मोठा गदारोळ उडाला असून अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

प्रकाश आंबेडकर राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना म्हणाले, “मला कुठेतरी जाणवायला लागले आहे कि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सध्या अध्यक्ष जरी असले तरी नजीकच्या काळात राज ठाकरे हे अध्यक्ष होतात का? शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे असली तरी राज ठाकरे त्या शिवसेनेचे अध्यक्ष होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीनंतर तसेच विधानसभा निवडणुकांपूर्वी राइज ठाकरे त्यांचा मनसे पक्ष शिवसेनेत विलीन करू शकतात किंवा शिवसेना पक्षप्रमुख हे पॅड त्यांच्याकडे जाऊ शकते, असे मला जाणवू लागले आहे. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात भाषण करून आपण शिवसेनेचा अध्यक्ष होणार नाही हे जरी सांगितलं असलं तरी त्याचा अर्थ होय असा आहे.”

पुढे ते म्हणाले, ” भाजपचा जो गेमप्लॅन आहे तो समजला पाहिजे. मोदी यांनी उद्धव ठाकरेंची परिस्थिती वाईट झाली तर आम्ही त्यांना मदत करू असं म्हणत गाजर दाखवलं होत. तर दुसरीकर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांना भाजपने प्रचारात घेऊन हळुवारपणे एकनाथ शिंदे यांच्याकडील नोंदणीकृत शिवसेना पक्ष राज ठाकरे यांना देण्याचा घाट तर घातला नाही ना असा प्रश्न आहे. यावर कोण सर्वाइव्ह करणार? जस इंडिकेट सिंडिकेट काँग्रेस झाली त्यावेळी इंदिरा गांधींची काँग्रेस वाचली. अश्या परिस्थितीत उद्या राज ठाकरे अध्यक्ष झाले तर ते आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशी सर्व्हायव्हलची चुरस असेल. त्या चुरशीच्या कोण तग धरेल, हे पाहावं लागेल,” असे ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा:

अजित पवारांच्या अनुपस्थितीवर शरद पवारांचा खुलासा

राहुल गांधी, खरगेंनतर CM Eknath Shinde यांच्याही बॅगांची तपासणी, शिवसेनेत नाराजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version