Raj Thackeray यांचा आज औरंगाबाद दौरा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) आज औरंगाबादच्या (Aurangabad) दौऱ्यावर जाणार आहेत.

Raj Thackeray यांचा आज औरंगाबाद दौरा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) आज औरंगाबादच्या (Aurangabad) दौऱ्यावर जाणार आहेत. परंतु त्यांचा हा दौरा पूर्णपणे खाजगी दौरा आहे असं म्हंटल जात आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. मनसे च्या एका नेत्याच्या मुलाचा लग्न सोहळा आहे आणि या कार्यक्रमासाठी राज ठाकरे औरंगाबादमध्ये जाणार आहेत. संध्याकाळी ४. ३० वाजता राज ठाकरे औरंगाबादमध्ये पोहचणार आहे. तर आजचा मुक्काम देखील ते औरंगाबादमध्येच करणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ४. ३० वाजता राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत. परंतु त्यांचा हा संपूर्ण दौरा खाजगी असणार आहे. मनसेचे नेते गणेश सातपुते यांच्या मुलाच्या लग्नासाठी राज ठाकरे हे औरंगाबादला जाणार आहेत. हा दौरा खाजगी असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा पक्षाचा कार्यक्रम हा तिथे होणार नाही आहे. तसेच पक्षाचा कोणत्याही प्रकारच्या बैठका सुद्धा होणार नाही आहेत. मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांचं ४. ३० वाजता औरंगाबाद विमानतळावर आगमन होईल. तिथे सर्व मनसे पदाधीकारी यांचे स्वागत करतील. पुढे विवाहस्थळी येथे उपस्थित राहून लग्नाच्या शुभेच्छा देतील. तसेच त्यानंतर हॉटेल रामा येथे राज ठाकरे मुक्कामी असणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता पुन्हा ते विमानाने मुंबईकडे रवाना होतील.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद दौरा केला होता. त्यावेळेस औरंगाबाद जिल्ह्यातील पक्ष कार्यकारणीत मोठ्याप्रमाणात बदल केला होता. त्यानंतर मनसे हा पक्ष औरंगाबादमध्ये मोठा प्रमाणात सक्रिय असताना दिसला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक आंदोलने देखील करण्यात आली आहेत. तसेच अनेकांनी मनसेमध्ये पक्ष प्रवेश देखील केला आहे. परंतु आता शहरात मनसे हा पक्ष शांती-शांती पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे महत्त्वाचे नेते देखील सक्रिय नसल्याचे पाहायला मिळत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या दौऱ्यात राज ठाकरे जिल्ह्यातील मनसे नेत्यांना काही सल्ला देणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहेत.

हे ही वाचा : 

जाणून घ्या आत्तापर्यंतचे Maharashtra Bhushan पुरस्काराचे मानकरी

मोठी बातमी! आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर, ‘टाईम महाराष्ट्र’ने आधीच दिल होत वृत्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version