Rajkot Fort: Chetan Patil चा जामीन अर्ज फेटाळला तर Jaydeep Apte च्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Rajkot Fort: Chetan Patil चा जामीन अर्ज फेटाळला तर Jaydeep Apte च्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Rajkot Fort: राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या जयदीप आपटे (Jaydeep Apte) आणि चेतन पाटील (Chetan Patil) यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने आरोपी चेतन पाटील याला दिलासा देऊन त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. आरोपी जयदीप आपटे याला 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

सिंधुदुर्गमधील मालवण  (Malvan) येथील पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटे यांची आज 13 सप्टेंबर रोजी पोलीस कोठडीची मुदत संपली. मालवण पोलिसांनी जयदीप आपटेला मालवण न्यायालयासमोर हजर केले. बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर ओरोस येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यामुळे जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांचं काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या जयदीप आपटे याला 24 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जयदीप आपटे हा मागील आठ दिवसांपासून मालवण पोलीस कोठडीत होता. त्यानंतर आज त्याला मालवणच्या दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले आणि अंतिम निर्णय जाहीर करण्यात आला. सिंधुदुर्ग मालवण मधील पुतळा दुर्घटना प्रकरणी बांधकाम सल्लागार असलेल्या चेतन पाटील याचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे चेतन पाटीलला आता येत्या 19 सप्टेंबरपर्यंत जेलमध्येच थांबावे लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते ९ महिन्यांपूर्वी उदघाटन करण्यात आलेल्या मालवण येथील शिवछत्रपतींचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी सकाळी कोसळला. पुतळा कोसळल्यानंतर कुडाळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यासह शिवप्रेमींनी कंत्राटदाराच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. या घटनेमुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेच्या चौकशीसाठी संयुक्त तांत्रिक समिती नियुक्त करण्याबाबत प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले होते. याप्रकरणी बांधकाम सल्लागार म्हणून कार्यरत असणाऱ्या चेतन पाटीलला पोलिसांनी अटक केली. मात्र पुतळ्याचा शिल्पकार असलेल्या जयदीप आपटे काही पोलिसांच्या हाती लागला नव्हता. शेवटी 11 दिवसांच्या अथक प्रयत्नांनी मागच्या आठवठ्यात जयदीप आपटेला अटक करण्यात पोलिसांना यश आले. अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांची नजर चुकवत जयदीप आपटे त्याची पत्नी आणि आईला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत; समोर आला भलताच प्रकार

सन्मानासाठी बुरखा वाटप केले तर मग त्यात वावगं वाटण्यासारखं काय? Yamini Jadhav यांचा विरोधकांना सवाल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version