Tuesday, September 24, 2024

Latest Posts

अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रामदास आठवले यांची पहिली प्रतिक्रिया, संजय राऊतांवर बोचरी टीका करत म्हणाले…

Akshay Shinde Encounter : बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची घटना काल (सोमवार, २३ सप्टेंबर) घडली. आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावत तीन राउंड फायर केले. यादरम्यान पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याप्रकरणात विरोधकांनी संशय व्यक्त करत सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. यावर आता रामदास आठवले प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यादरम्यान रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील चांगलाच हल्लाबोल केला आहे.

“संजय राऊत म्हणतात शिंदेंनी शिंदेच एन्काऊंटर केलं. पण एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे एन्काऊंटर केलं. उद्धव ठाकरेंच राजकीय एन्काऊंटर केलं” अशा शब्दात रामदास आठवले यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. “अक्षय शिंदे याने केलेला प्रकार निंदनीय होता. माणुसकीला कलंक लावणारी ती घटना होती. मी मागणी केली होती की, त्याला फाशी व्हायला पाहिजे. त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याच्यावर गोळी झाडावी लागली. विरोधी पक्षाने यावर राजकारण करण्याची काही गरज नाही” असं रामदास आठवले म्हणाले.

“महायुतीमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मोठ्या पक्षात सीटचा वाद आहे. अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते जागांवर तोडगा काढतील. माझ्या RPI पक्षाला १० ते १२ जागा आम्हाला मिळाव्यात. या जागा सगळ्या महाराष्ट्रातील आहेत. आम्हाला त्या जागा मिळाल्या तर दलित मतांना वळवण्यात यश येईल” असं रामदास आठवले म्हणाले. “दलित मतदार आपल्या बाजूला वळवण्यासाठी RPI ला एक विधानपरिषद आणि 2 महामंडळं आम्हाला मिळावित, ही आमची मागणी आहे” असं रामदास आठवले म्हणाले.

हे ही वाचा:

Akshay Shinde Encounter: आधी भरचौकात फाशी देण्याची मागणी मग आता त्या नराधमाविषयी एवढी आपुलकी कशी वाढली? Naresh Mhaske यांचा सवाल

Akshay Shinde Encounter: असे अजून दहा-पंधरा ठोकले तरी काय हरकत नाही पण…काय म्हणाले Nilesh Rane?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss