spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यात गोवर रुग्णांच्या प्रादुर्भावात झपाट्याने वाढ, औरंगाबादमध्ये 7 नवे रुग्ण, तर संशयितांचा आकडा ८० वर

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गोवर (Measles Outbreak In Mumbai) या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. प्रामुख्याने लहान मुलांना या आजाराचा विळखा पडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत दोन दिवसांपूर्वी ७८ नव्या गोवर (Measles Disease) रुग्णांची भर पडली. गोवर हा आजार संसर्गजन्य आहे आणि तो प्रामुख्याने लहान मुलांना होतो. मुंबई नंतर आता औरंगाबादकरांची चिंता वाढली आहे. शहरात एकाच दिवसांत ७ गोवर बाधित रुग्ण पहिल्यांदाच आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, काल गुरुवारी १४ संशयित रुग्ण देखील आढळले आहेत. बुधवारी औरंगाबाद शहरात (Aurangabad) ६ रुग्ण वाढले होते. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी आणखी ७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे.

हेही वाचा : 

कर्नाटक सरकारने महाराष्ट्राला डिवचल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेनी केली ‘ही’ मोठी घोषणा

मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी माध्यमांना माहिती देताना म्हटले आहे की, “आरोग्य विभागाने ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना लसीचा अतिरिक्त डोस देण्याची सूचना केली केली आहे. शहरात गुरुवारी सात बालकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गोवरबाधित बालकांमध्ये विजयनगर तीन, कैसर कॉलनी एक, बायजीपुरा एक आणि भवानी नगरमधील दोन बालकांचा समावेश आहे. तसेच अंबिकानगर, गणेश कॉलनी, नक्षत्रवाडी, नारेगाव, एन-8, चिकलठाणा, हर्सल, हर्षनगर या भागांत प्रत्येकी एक आणि बायजीपुरा आणि पुंडलिकनगर भागांत प्रत्येकी दोन याप्रमाणे १४ बालके संशयित आढळली आहेत. सर्व संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.

गोवरची लक्षणे

अंगावर लाल पुरळ किंवा लाल रंगाचे रॅश येणे
सुरुवातीला मुलांना खोकला आणि सर्दी ही लक्षणे, डोळे लाल होणे
बालकांमध्ये अशक्तपणा

Mumbai Local मुंबईची लाईफलाईन लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा, हायकोर्टात जनहित याचिका

काळजी कशी घ्यावी

लक्षणे असलेल्या बालकांना जीवनसत्त्व ‘अ’ चे दोन डोस २४ तासांच्या अंतराने देणे आवश्यक
पाच वर्षांखालील बालकांमध्ये कुटुंबीयांनी गोवरच्या लक्षणांवर लक्ष ठेवावे
मुलांना गोवरची लक्षणे असल्यास शाळेत आणि इतर कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी त्याला पाठवू नये
लक्षणे आढळून आल्यास घाबरून न जाता बालकास तातडीने नजीकच्या महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करावे
घरच्याघरी उपचार किंवा अंगावर काढू नये

lemon आरोग्यास लिंबू गुणकारी फायदे

Latest Posts

Don't Miss