spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अखेर राज्यसरकारचे तुपकरांना बैठकीचे निमंत्रण; Ravikant Tupkar यांचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित

सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा,अतिवृष्टीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून सरंक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी सिंदखेडराजात गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले हॊते. या आंदोलनादरम्यान रविकांत तुपकर यांची तब्येत खालावली होती. तरीदेखील सरकार मागण्यांची योग्य दाखल घेत नसल्याचे सांगत त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. दरम्यान शासनाने या आंदोलनाची दखल घेतली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मागण्यासंदर्भात ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक बोलावली आहे. त्यामुळे तुपकर यांनी आपले अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार व संबंधित विभागाचे मंत्री अधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले असून प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी रविकांत तुपकरांना बैठकीच्या निमंत्रणाचे लेखी पत्र दिले. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या बैठकीसाठी मध्यस्थी केली आहे. शासनाने आंदोलनाची दखल घेऊन तुपकरांना चर्चेसाठी बोलाविले आहे, त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती शेतकरी व सहकाऱ्यांनी केल्यानंतर रविकांत तुपकर यांनी आंदोलन स्थळी उपस्थित महिलांच्या हस्ते व माँसाहेब जिजाऊ चरणी नतमस्तक होत आपले अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित केले. “बैठकीत काय निर्णय होतो हे पाहून पुढील दिशा ठरवू, जर ठोस निर्णय झाले नाही तर राज्यभर आक्रमकपणे पुन्हा रस्त्यावर उतरू,” असे रविकांत तुपकर यांनी यावेळी सांगितले आहे.

शेतकऱ्यांनी कायदा हातात घेतल्यास त्याला सरकार जबाबदार, तुपकरांचा इशारा

रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा काल (शनिवार, ७ सप्टेंबर) चौथा दिवस होता. यावेळी त्यांची प्रकृती खालावली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकराल इशारा दिला होता. “सरकारला माझा जीव घ्यायचा असेल तर घ्यावा. मी शहीद व्हायला तयार आहे, पण महाराष्ट्रातील सरकारला कर्जमुक्त करा, सोयाबीन दरवाढ करा, पिक वीमा उशीरा दिलेल्या कंपनींवर कारवाई करा आणि राहिलेला पिकवीमा लवकर द्या. संयम तुटला आणि शेतकऱ्यांनी कायदा हातात घेतल्यास त्याला सरकार जबाबदार असेल,” असे ते म्हणाले होते.

हे ही वाचा:

शिवरायांच्या पुतळ्याबाबत कालीचरण महाराज म्हणाले, नरेंद्र मोदींनी माफी मागितली हा…

Congress, Sharad Pawar गट मुख्यमंत्रीपदासाठी Uddhav Thackeray यांचे नाव कधीही घोषित करणार नाहीत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचे मोठे विधान

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss