EWS अंतर्गत मराठा उमेदवारांच्या भरती प्रक्रियांना मिळाली तात्पुरती स्थगिती

पोलीस भरतीच्या उमेदवारांना मराठा आरक्षण प्रश्न्नामुळे राखडवण्यात आले आहे. जोपर्यंत या आरक्षणाच्या मुद्द्यावर तोड निघत नाही तोपर्यंत भरतीप्रक्रिया स्थगित होण्याची शक्यता आहे. तूर्तास या पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे.

EWS अंतर्गत मराठा उमेदवारांच्या भरती प्रक्रियांना मिळाली तात्पुरती स्थगिती

सध्या राजकीय वातावरण हे आरक्षणाच्या मुद्द्यांवरून गटांगळ्या खात आहे. यावरून राजकीय वर्तुळ मोठ्याप्रमाणावर वादंग निर्माण झालेला आपण पाहत आहोतच. एक समाज हा दुसऱ्या समाजाच्या तीव्र विरोधात जात असतानाच, राजकीय पक्ष हे आपली पोळी भाजताना दिसत आहे. या वादनगांमुळे मुलांच्या भवितव्याचा खेळ केला जात आहे. आरक्षण मुद्द्यावरून राजकारण तर तापातच आहे, परंतु याचे पडसाद जातीय वादाकडे झुकताना दिसत आहे. यामुळे दोन्ही वर्गात दरी निर्माण होऊ शकते. आरक्षणमुळे अनेक भरती प्रक्रिया असतील, प्रवेश प्रक्रिया आहेत त्या रखडल्या आहेत. अश्यातच आता EWC मधील घटकांसाठी मोठी बातमी आली आहे. ज्यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी स्थगिती दिली गेली आहे. २०२२-२३ च्या पोलीस भरती प्रक्रियेच्या EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याबद्धल सवीस्तर जाणूयात.

पोलीस भरतीच्या तरुणांच्या दृष्टिकोनातून ही बातमी महत्वपूर्ण आहे. पोलीस भरती प्रक्रियेसाठी (Nashik Police Recruitment) आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या मराठी उमेदवारांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. उर्वरित उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. यासंदर्भात अप्पर पोलीस महासंचालकांचे संबंधित विभागांना पत्र लिहिलं आहे. तसेच, मराठा आरक्षणाचा गोंधळ कायम असल्यानं असा निर्णय घेत असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. अप्पर पोलीस महासंचालकांच्या या निर्णयामुळे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस भरतीसाठी आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या मराठी उमेदवारांच्या निवडीला तात्पुरता ब्रेक लागला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया दोन महिन्यांपासून राज्यभरात सुरू आहे. अद्याप अनेक ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मैदानी चाचणी होऊन, लेखी परीक्षा पार पडल्या, त्यानंतर अंतिम निवड यादीही जाहीर झाली.

पोलीस भरतीसाठी मराठा समाजाच्या उमेदवारांनी EWS प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज केल्यानं निर्माण झालेला पेच अद्यापही कायम आहे. मराठा उमेदवारांच्या नियुक्ती बाबत धोरण निश्चितीसाठी अप्पर महासंचालकांची शासनाला विनंती केली आहे. अशातच शासननिर्णय होईपर्यंत EWS प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्याऐवजी तात्पुरती स्थगित देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी अप्पर महासंचालक कार्यालयाकडून EWS प्रवर्गातील उमेदवारांना SEBC अथवा खुल्या प्रवर्गाची निवड करण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र नाशिक जिल्हयातील तात्पुरत्या निवड यादीतील EWS प्रवर्गातील ६ पैकी ४ मराठा उमेदवारांनी हमीपत्र देण्यास नकार दिल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, अप्पर महासंचालकांच्या नव्या आदेशानं या उमेदवारांची भरती रद्द न होता, तात्पुरती स्थगित करण्यात आल्यानं मराठा उमेदवारांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. अशातच आता शासन निर्णय काय होतो? आणि आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांच्या पोलीस भरतीबाबत नेमकी काय भूमिका प्रशासन घेतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

T20 series : Rinku आणि Surya यांच्या कामगिरीने केले Team India ला विजयी

Beetroot Paratha Recipe: पौष्टिक आणि चविष्ट बीटरूट पराठा नक्की ट्राय करा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version