शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा, कशेडी घाटातील एकेरी मार्ग खुला

कोकणातील चाकरमान्यांसाठी शिमगा आणि गणेशोत्सवात हा सण सगळ्यात जवळचा आहे.

शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा, कशेडी घाटातील एकेरी मार्ग खुला

कोकणातील चाकरमान्यांसाठी शिमगा आणि गणेशोत्सवात हा सण सगळ्यात जवळचा आहे. त्यामुळे आता शिमग्यासाठी कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. कशेडी घाटातील बोगद्याचा एकेरी मार्ग सुरु केला जाणार आहे. त्यामुळे कोकणकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कशेडी घाटातील हा बोगदा शनिवारपासून सुरु केला जाणार आहे.

कोकणात शिमगा आणि गणपती सणांसाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावी जातात. त्यातच आता कोकणात येणाऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग विभागाने खुशखबर दिली आहे. कोकणात जाताना लागणार रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील कशेडी घाटामध्ये बोगद्याचा एकेरी मार्ग शनिवारपासून सुरू केला जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून कोकणात येणारी वाहने या बोगद्याचा वापर करू शकणार आहेत. कोकणातून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी कशेडी घाटाचा वापर करावा लागतो. तसेच आता दुसऱ्या बोगद्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा मार्ग सुरु होणार असल्यामुळे शिमगोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. होळी आधीच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

२०१९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून बोगद्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास चार वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा या बोगद्याचे काम पूर्ण झाले नव्हते. मात्र आता हे काम पूर्ण होत आहे. मागील अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या कामाची २०२४ डिसेंबरची लास्ट डेडलाईन देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन दिवस रात्र काम करून या मार्गावरील चौपदरीकरण लवकरात लवकर पूर्ण करत आहेत.

हे ही वाचा:

बुलढाण्यामध्ये विषबाधा झालेल्या रुग्णांवर रस्त्यावर उपचार,सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आले अडचणीत, वाघाची शिकार केली अन्…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version