सामान्य जनतेला दिलासा; LPG Gas सिलेंडर आजपासून ११५ रुपयांनी स्वस्त

सामान्य जनतेला दिलासा; LPG Gas सिलेंडर आजपासून ११५ रुपयांनी स्वस्त

आजपासून नोव्हेंबर महिना सुरु झाला आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे, आज १ नोव्हेंबर २०२२ रोजी एलपीजीच्या दरांत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारनं एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. मात्र, देशभरातील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात ही कपात झाली आहे. आज मंगळवार १ नोव्हेंबर २०२२ पासून १९ किलोचा व्यावसायिक LPG सिलेंडर ११५.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. पण, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. ६ जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या किंमत स्थिर आहेत.

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेला दिलासादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये जनतेला दिलासा देत सरकारने व्यावसायिक एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ११५.५० रुपयांनी कमी केली आहे. मात्र ६ जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्यांकडून एलपीजी गॅसचे दर जाहीर केले जातात. इंधन कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीच्य दरात बदल करतात. या, ऑक्टोबर महिन्यात व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडर दरात २५.५ रुपयांची कपात करण्यात आली होती.

दिल्लीत १९ किलोच्या इंडेन एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता १७४४ रुपये झाली आहे, जी पूर्वी १८५९.५ रुपये होती. मुंबईत १८४४ मध्ये व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होते, ते आता १६९६ रुपयांना मिळणार आहेत. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आता १८९३ रुपये आहे, ज्यासाठी पूर्वी २००९.५० रुपये मोजावे लागत होते. आता कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत १८४६ रुपये असेल, जी आधी १९९५.५० रुपये होती. जनतेला दिलासा देत सरकारनं व्यावसायिक एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारनं व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ११५.५० रुपयांनी कमी केली आहे.

हे ही वाचा :

सीटबेल्ट संदर्भात मुदतवाढ, तुर्तास समज; ‘या’ तारखेपासून सुरू होणार कारवाई

अमरावतीमध्ये बचू कडूंचा जाहीर मेळावा; मेळावा स्थळी झळकले ‘मै झुकेगा नही’ चे बॅनर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version