Republic Day 2023, महाराष्ट्राच्या चित्ररथात साडेतीन शक्तीपिठांचं सादरीकरण!

Republic Day 2023, महाराष्ट्राच्या चित्ररथात साडेतीन शक्तीपिठांचं सादरीकरण!

आज संपूर्ण भारत देश ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आजच्या दिवशी संपूर्ण भारत देशात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असते. आजच्या दिवसाला भारतीय राज्यघटना लागू झाली. १५ ऑगस्ट १९४७ च्या दिवशी भारताला स्वतंत्र मिळाले. परंतु २६ जानेवारी १९५० रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणूंन घोषित केले. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संपूर्ण देशात विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जातात. भारत देश हा वेगवेगळ्या जाती, धर्मचा देश आहे. देशातला कोणत्याही जातीचा, धर्माचा नागरिक असो तोच प्रजासत्ताक दिनाच सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करत असतो.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संचलन सोहळ्याची उत्सुकता सर्वाना लागलेली असते. सर्व देशवासीयांच्या नजरा लागलेल्या असतात. प्रत्येक वर्षी आपण प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कोणी ना कोणी विदेशी प्रमुख पाहुणे आमंत्रित करतो. यंदाच्या वर्षी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देह फताह एल सीसी हे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रमुख पाहुणे असतील. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी इजिप्तच्या लष्कराची तुकडीही परेडमध्ये सहभागी होणार आहे. इजिप्शीयन आर्मीचा १२ सदस्यांची बँडही परेडमध्ये सहभागी होणार आहे.

यंदा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कर्तव्य पथावर नारी शक्तीचा सहभाग दिसून आला आहे. तसेच या वर्षीच विशेष आकर्षण म्हणजे बॉर्डर सिक्यूरीटी फोर्सच्या महिला जवानाचं उंटाचं पथक. या तुकडीने पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या संचनलनात भाग घेतला आहे. आपल्या भारतीय पुरुष सहकाऱ्यांबरोबर भारतातील पहिला अधिकारी सुद्धा सीमा सुरक्षा दलाचं प्रतिनिधीत्व करणार आहेत.

हे ही वाचा:

Republic Day 2023, प्रजासत्ताक दिनानिमित्त गूगलने शेयर केलं सुंदर डुडल

Republic Day 2023, राष्ट्रपतींबरोबर असणाऱ्या बॉडीगार्ड्सची कशी केली जाते निवड?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version