Republic Day Parade 2024 : जय जिजाऊ, धन्य शिवराय…, दिल्लीच्या कर्तव्य पथावर झळकले माँसाहेब आणि बाल शिवबा

कर्तव्य पथावर सर्व राज्याचे चित्ररथ हे दिसून आले आहेत. परंतु यंदा दिल्लीच्या कर्तव्य पथावर माँसाहेब आणि बाल शिवबा झळकले आहेत.

Republic Day Parade 2024 : जय जिजाऊ, धन्य शिवराय…, दिल्लीच्या कर्तव्य पथावर झळकले माँसाहेब आणि बाल शिवबा

आज दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी आपला भारत देश हा आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. स्वतंत्र भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आपण साजरा केला जात आहे . या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु २६ जानेवारी १९५० रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. अश्यातच आज कर्तव्य पथावर देखील आपल्या भारताची ताकद ही आपल्याला दिसून येणार आहे. तर कर्तव्य पथावर सर्व राज्याचे चित्ररथ हे दिसून आले आहेत. परंतु यंदा दिल्लीच्या कर्तव्य पथावर माँसाहेब आणि बाल शिवबा झळकले आहेत.

दिल्लीतील कर्तव्यपथावर भारताच्या तिन्ही दलाच्या सैनिकांकडून शक्तिप्रदर्शन आणि पथसंचलन करण्यात येते. त्याचबरोबर देशातील विविध राज्याच्या चित्ररथाचे प्रदर्शन करण्यात येते. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर झालेल्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला गेला. जासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या चित्ररथ संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला आहे. या चित्ररथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अन्याय आणि शोषण या विरोधातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. रयतेचा राजा, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव वर्णन करणाऱ्या ‘धन्य शिवराय… धन्य महाराष्ट्र !’ गीताची धूनही राजपथावर या चित्ररथासह सादर केला गेला. भारत देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्ये दर्शविणारे चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे.

तर दिल्लीत झालेल्या पथ संचलनासाठी ३० चित्ररथ प्रर्दशित झाले. यामध्ये १६ राज्य, ०७ केंद्रशासित प्रदेश व उर्वरित विविध केंद्रीय मंत्रालयांच्या चित्ररथांचा समावेश असणार आहे. देशभरातून एकूण ३० राज्यांनी राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती, विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील १६ राज्यांच्या चित्ररथांची निवड प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमासाठी करण्यात आली. दिल्ली केंट राष्ट्रीय रंगशाला परिसरात शुभ अ‍ॅड नागपूर या संस्थेमार्फत चित्ररथाची बांधणी करण्यात आली आहे. तर भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकामधील १६ कलाकारांच्या माध्यमातून चित्ररथाच्या सोबतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन करण्यात आले होते.

हे ही वाचा:

प्रजासत्ताक दिनानिमित्त विजय वडेट्टीवार यांनी दिला इशारा,

मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version