आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर

राज्यभरातील निवासी डॉक्टरांकडून (Resident Doctor) आजपासून संपाची (Strike) घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने पुकारलेल्या या संपानंतर राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज संपावर असणार आहे.

आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर

राज्यभरातील निवासी डॉक्टरांकडून (Resident Doctor) आजपासून संपाची (Strike) घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने पुकारलेल्या या संपानंतर राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज संपावर असणार आहे. दरम्यान आज सकाळी ८ वाजल्यापासून निवासी डॉक्टर्स राज्यातील शासकीय व पालिका महाविद्यालयात निदर्शने करणार असल्याची माहिती निवासी डॉक्टर संघटनेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या संपाचा फटका रुग्णांना बसण्याची शक्यता आहे.

निवासी डॉक्टरांच्या मागण्या काय?

– वरिष्ठ निवासी डॉक्टरांसाठी १,४३२ पदांची निर्मिती
– सहयोगी आणि सहायक प्राध्यापकांची पदे भरणे.
– महागाई भत्त्याची थकबाकी देणे.
– सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करणे.
– वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील असमानता दूर करणे.

मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये. आणि शासन स्तरावरून लवकरात लवकर मागण्या मार्गी लावाव्या. अन्यथा आम्हा निवासी डॉक्टरांना कठीण पावले उचलत आपत्कालीन (emergency) सेवा बंद करावी लागेल,असा इशारा निवासी डॉक्टर संघटनेकडून देण्यात आला आहे. तसेच करोनाचा धोका उद्भवत असून देखील शासन आम्हाला संप करण्यास भाग पाडत आहे. तरी आमच्या वरील मागण्या शासन स्तरावरून मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचा हा लढा संपाच्या माध्यमातून सुरू राहील. संपादरम्यान रुग्णसेवा ढासळण्यास पूर्णतः शासन जबाबदार राहील,असेही निवासी डॉक्टर संघटनेकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

अनेक प्रलंबित मागण्यांच्या निमित्ताने निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने सोमवार, २ जानेवारीपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे नव्या वर्षात कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवा कोलमडण्याचा धोका आहे, ही स्थिती टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. आपल्या विविध मागण्यासाठी राज्यभरातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर जाणार आहे. सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार करून देखील आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्यानं संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात आला आहे. तर अनेकदा मागणी करून देखील मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप निवासी डॉक्टर संघटनेकडून करण्यात आला आहे. तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी निवासी डॉक्टरांकडून आज राज्यभरातील शासकीय रुग्णालयात निदर्शने केली जाणार आहे.

हे ही वाचा:

रतन टाटा यांचे निकटवर्तीय R. K. Krishna Kumar यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन

पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला झाली सुरुवात

राजस्थानात रेल्वेचा मोठा अपघात, सूर्यनगरी एक्सप्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version