Wednesday, September 25, 2024

Latest Posts

महाराष्ट्रात परतीच्या पावसाची जोरदार बॅटींग…कुठे आहेत अलर्ट?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्रात आज दि. २५ सप्टेंबर रोजी पावसाचा जोर अधिक राहणार असून कोकण किनारपट्टीसह पुण्याला रेड अलर्ट तर मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या दोन तीन दिवसापासून परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात यंदा परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा अंदाज IMD ने दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून राज्यातील काही जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्रात आज दि. २५ सप्टेंबर रोजी पावसाचा जोर अधिक राहणार असून कोकण किनारपट्टीसह पुण्याला रेड अलर्ट तर मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार असून उर्वरित भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे. मुंबई ठाण्यासह बापूने आणि कोकणातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर मराठवाड्यात काही ठिकाणी ऑरेंज, येलो अलर्ट देण्यात आले आहेत. कमी दाबाचा पट्टा सध्या बंगालच्या उपसागरावर आहे. त्यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत.

कोणत्या भागात आहेत अलर्ट ?

रेड अलर्ट: पुणे, रत्नागिरी, रायगड

ऑरेंज अलर्ट: पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड

येलो अलर्ट: जळगाव, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव

Latest Posts

Don't Miss