वर्ध्यातील कारंजामधील फार्म हाऊसवर दरोडा

वर्ध्यातील कारंजा तालुक्यातील वाघोडा (Waghoda Robbery) येथे रात्रीच्या सुमारास फार्महाऊसवर दरोडा टाकण्यात आला आहे.

वर्ध्यातील कारंजामधील फार्म हाऊसवर दरोडा

वर्ध्यातील कारंजा तालुक्यातील वाघोडा (Waghoda Robbery) येथे रात्रीच्या सुमारास फार्महाऊसवर दरोडा टाकण्यात आला आहे. नागपूरमधील गोपाल पालिवाल या शेतकऱ्याचे वाघोडा येथे फार्महाऊस आहे. रात्री सात ते आठ वाजताच्या सुमारास या फार्महाऊस वर दरोड्यानी दरोडा घातला आहे. शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवून ५५ पोते सोयाबीन, सोन्याचे दागिने फार्महाउसवरून लुटून नेले. तसेच एका व्यक्तीच्या पोटात चाकू भोकसून त्याला गंभीर जखमी केले.

नागपूरमधील नारायण पालिवाल यांचे वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोडा येथे एक फार्महाऊस आहे. आठवड्यातून एकदा ते फार्महाऊस वर येत असतात. तसेच त्यांचे पीक आणि शेतीमधून निघणारे उत्पादन देखील याच फार्महाउस वर ठेवले होते. मध्य रात्रीच्या सुमारास दोन जणांनी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर त्यांच्या मुलाने दरवाजा उघडताच पाच ते सहा जण तिथे आले. त्यांनी त्याला धमकावण्यास सुरुवात केली. यावेळी फार्महाऊसवर नारायण पालीवाल (८० वर्ष), त्यांचा मुलगा गोपाल पालिवाल (५०वर्षे) आणि हरिकुमारी पालिवाल (७० वर्ष) हे सगळे उपस्थित होते. यामध्ये दरोडेखोरांनी गोपाल पालिवाल याच्या पोटात चाकू भोकसला.तसेच त्यांनी त्याच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातले हिसकावून घेतली. सोबत त्यांनी ५५ सोयाबीनची पोती लंपास केली. हा सर्व प्रकार रविवारी रात्रीच्या सुमारास घडला आहे.

दरोडेखोरांनी कपाटातील सामानाची देखील उपसाउपास केली. त्यानंतर दाम्पत्याला ठार मारण्याची धमकी दिली. धमकी दिल्यानंतर दरोडेखोर पसार झाले. त्यानंतर हरीकुमार यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. पण तोपर्यंत दरोडेखोर पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी जाऊन भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याआधी सुद्धा ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर (Robbery at Jyoti Kranti Multistate Bank) दरोडा घालण्यात आला होता. संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास हा दरोडा घालण्यात आला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दिवसाढवळ्या बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून दरोडा घातल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीमध्ये एकूण चार आरोपी दरोडा घालत असल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा:

स्वानंदी-आशिषची संगीत नाईट दणक्यात पडली पार,आई-बाबाही थिरकले

New Year मध्ये फिरायला जायचा विचार करताय? तर पुण्यातील या ठिकाणांना द्या नक्की भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version