Sunday, September 29, 2024

Latest Posts

थोरल्या पवारांकडून संकेत मिळताच रोहित पवारांचे झळकले बॅनर्स, भावी मुख्यमंत्री…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल जामखेड तालुक्यातील खर्डा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात आगामी काळात रोहित पवार (Rohit Pawar) हे मंत्री असतील असे सूचक वक्तव्य केलं.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते म्हणजे राज्यातील विधानसभा निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष हे राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांकडे आहे. दिवाळीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका पार पडतील अशी चर्चा देखील जोरदार सुरू आहे आणि या स्पर्शभूमीवर सगळेच पक्ष हे कामाला देखील लागले आहेत. अश्यातच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणारा अनेक घडामोडी या घडत आहेत. भावी मुख्यमंत्री कोण होणार याच्या अनेक चर्चा या रंगत आहेत. अनेक दिवसांपासून भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नावांची जोरदार चर्चा चालू आहे. अजित पवार यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत होत. त्यांनतर देवेंद्र फडणवीस यांचा देखील भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे, जयंत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले (Nana Patole) अश्या अनेक नावांची राज्यात जोरदार चर्चा चालू आहे. अश्यातच आता आणखी एका नावाचा उल्लेख यामध्ये केला जात आहे. अंडी हे नाव म्हणजे रोहित पवार (Rohit Pawar).

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल जामखेड तालुक्यातील खर्डा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात आगामी काळात रोहित पवार (Rohit Pawar) हे मंत्री असतील असे सूचक वक्तव्य केलं. यानंतर आज नाशिकसह अनेक ठिकाणी रोहित पवारांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर्स झळकले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात आले आहे. नाशिक शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहे. तर राज्यातील अनेक ठिकाणी देखील रोहित पवारांचे बॅनर्स लागले आहेत. रोहितची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची पुढची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी असेल, असे वक्तव्य शरद पवारांनी काल केले होते. यानंतर आज भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवारांचे बॅनर झळकल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत रोहित पवारांचेही नाव चर्चेत आल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीचे वेध लागताच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून राज्यभरात मेळावे आणि सभा घेतल्या जात आहे. तर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असणार? याबाबत चर्चा सुरु आहे. याआधी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा आशयाचे बॅनर झळकले आहेत. आता रोहित पवारांचे बॅनर झळकल्याने या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा:

Anand Dighe यांना मोठ्या पदावर बसवलं तर… दिघेंच्या हत्येवरून Sanjay Shirsat यांचा पुन्हा एकदा गंभीर आरोप

PM Narendra Modi यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन, असे असणार मेट्रोमार्गाचे तिकीट दर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss