बालचोर असल्याच्या संशयावरून साधूंना मारहाण

बालचोर असल्याच्या संशयावरून साधूंना मारहाण

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये बाळचोरीच्या प्रकरणात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहेत. काल साबगले मध्ये एक भयंकर प्रकार घडला आहे. महाराष्ट्रातील सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. बालचोर असल्याच्या संशयावरून सांगलीतील ग्रामस्थांनी ४ साधूंना बेदम मारहाण केल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यामध्ये चारही साधू मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याचे समोर येत आहे. महत्वाची बातमी म्हणजे साधूंना बेदम मारहाण झाली तरी पोलिसांनी अजून गुन्ह्याची नोंद केली नसल्याची माहिती मिळत आहे. अनेकी साधू संघटनांची त्वरित करावीची मागणी पोलिसांना करण्यात आली आहे. या आधी सुद्धा महारष्ट्र मध्ये काही साधूंना असच बेदम मारहाण करण्यात आले होती.


उत्तर प्रदेशात राहणारे चार साधू कर्नाटकातील विजापूरहून पंढरपूरला कारमधून जात असताना जाट तालुक्यातील लवंगा गावात ही घटना घडली. या प्रकरणी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘हे लोक सोमवारी गावातील एका मंदिरात थांबले होते आणि मंगळवारी प्रवास सुरू करताना त्यांनी एका मुलाला रस्ता विचारला, ज्यामुळे काही स्थानिक लोकांना ते मुलांचे अपहरण करत असल्याचा संशय आला. ते गुन्हेगारी टोळीचा भाग आहेत.असे समजून त्यांना बेदम मारण्यात आले आहे.
या घटने नंतर सगळीकडून पोलिसांनी तक्रार नोंद करावी अशी मागणी होत आहे. याच मुद्यावर अधिकाऱ्यांना कडून सांगण्यात आले आहे कि, दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली, जी पाहता पाहता वाढली आणि स्थानिक लोकांनी साधूंना काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.’ त्याच वेळी, अधिकाऱ्याने सांगितले की, ‘पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि साधू उत्तर प्रदेशातील एका आखाड्याचा सदस्य असल्याचे आढळले’. मात्र, साधूंवर जमावाने हल्ला केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर सांगलीचे एसपी दीक्षित गेडाम म्हणाले की, ‘आमच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही किंवा कोणतीही औपचारिक तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.’मात्र, आम्ही व्हायरल झालेला व्हिडिओ आणि वस्तुस्थितीची पडताळणी करत आहोत. याप्रकरणी आवश्यक ती कारवाई केली जाईल.

हे ही वाचा :

Happy Birthday Suryakumar Yadav : जाणून घेऊया, टीम इंडियाच्या हुकुमी एक्काबद्दल

Koffee With Karan Episode 10 : आलिया भट्टच्या एका कमेंटवर कतरिना कैफने ‘सुहागदीन’ कल्पना सुचवली

Exit mobile version