spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सोलापुरात चक्क ‘Love Pakistan’ संदेश असलेल्या फुग्यांची विक्री, ईदच्या दिवशी शांतता भंग करण्याचा उद्देश ?

पण त्या फुग्यासंदर्भात कसलीच माहिती नसल्याचं ताब्यात घेतलेल्या फुगे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच या फुग्यांवर काय लिहिलं आहे हे देखील समजत नसल्याचं या फुगे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे

आज मुस्लिम बांधवांचा ईद हा सण अनेक भागात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. परंतु सोलापुरात (Solapur) मात्र ईदगाहच्या बाहेर घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोलापुरातील ईदगाह मैदानाजवळ पाकिस्तानच्या समर्थनार्थ संदेश असलेले फुगे विक्रीला आल्याने सर्वांना धक्का बसला. परंतु या घटनेच्या वेळेस तिथल्या मुस्लिम बांधवांनी हजरजबाबीपणा दाखवत फुगे विक्रेत्याला तात्काळ पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा राडा त्याठिकाणी झाला नाही.

सोलापुरातल्या होटगी रोडवरील आलमगीर ईदगाह समोर सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हजारो मुस्लिम बांधव नमाज पठण करुन बाहेर पडले होते. याच वेळी ईदगाहच्या बाहेर पाकिस्तानाच्या समर्थनार्थ फुगे विक्री सुरु असल्याचं या मुस्लिम बांधवांच्या लक्षात आलं. पंरतु तिथे उपस्थित असलेला जमाव आक्रमक होण्याआधीच तिथे उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांनी फुगे विक्री करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी देखील तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. तसेच यासंदर्भात पोलीस अधिक तपास देखील करत आहेत. आतापर्यंत याप्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पण त्या फुग्यासंदर्भात कसलीच माहिती नसल्याचं ताब्यात घेतलेल्या फुगे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच या फुग्यांवर काय लिहिलं आहे हे देखील समजत नसल्याचं या फुगे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र या सगळ्यामध्ये पाकिस्तानाच्या समर्थनार्थ संदेश लिहिले हे फुगे सोलापुरात आलेच कसे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एकूण १०० फुग्याचं हे पाकीट होतं. परंतु केवळ दोन ते तीन फुग्यांवरच पाकिस्तानाच्या समर्थनार्थ संदेश लिहिण्यात आले होते. ज्या व्यापाऱ्याकडून हे फुग्यांचे पाकीट विकत घेण्यात आले त्याने सांगितलं की, हे फुग्याचं पाकीट सील बंद होते, त्यामुळे त्यावर असा संदेश लिहिणारे फुगे कुठुन आले या संदर्भात काही कल्पना नाही. दरम्यान हे फुगे मुंबईत खरेदी करण्यात आले असून चायनिज बनावटीचे हे फुगे असल्याचं यावेळी या व्यापाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

Prajakta Mali ने सह कलाकारासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

Delhi Cab Driver, एकाच टँक्सीमध्ये WiFi पासून Snacks सह सर्व सुविधा उपलब्ध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss