Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरून प्रवास करायचा? घ्या जाणून टोलची रक्कम…

संपूर्ण महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून चर्चेत असणारा समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Mahamarg) पहिला टप्पा दिवाळीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. हा पहिला टप्पा म्हणजे नागपूर ते शिर्डी (Nagpur To Shirdi) असा असणार आहे.

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरून प्रवास करायचा? घ्या जाणून टोलची रक्कम…

संपूर्ण महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून चर्चेत असणारा समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Mahamarg) पहिला टप्पा दिवाळीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. हा पहिला टप्पा म्हणजे नागपूर ते शिर्डी (Nagpur To Shirdi) असा असणार आहे. या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होण्याची शक्यता हि वर्तवली जात आहे. नागपूर ते मुंबईचा प्रवास ८ तासात पूर्ण करणारा हा महामार्ग आहे. परंतु या महामार्गाला नक्की टोल हा किती असेल याची चर्चा सध्या सर्व ठिकाणी सुरु आहे.

टोल दराची माहिती देणारे फलक महामार्गावर लावण्यात आले आहेत. येत्या तीन वर्षांसाठी म्हणजे २०२५ पर्यंत हे टोल दर लागू असणार आहेत. नागपूर ते मुंबई असा थेट ७०१ किमी अंतरासाठी जवळपास १२०० रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. समृद्धी महामार्गावर मोटर, जीप, व्हॅन आदी हलकी मोटर वाहनांसाठी १.७३ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे. तर, हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बससाठी २.७९ रुपये प्रतिकिमी दर इतका टोल असणार आहे. बस, ट्रकसाठी ५.८५ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल दर असणार आहे. म्हणजेच अंदाजे ४००० रुपये बस किंवा ट्रक साठी मोजावे लागणार आहेत. त्याशिवाय, अवजड बांधकाम यंत्रसामग्री, अनेक चाकांच्या वाहनांसाठी ९.१८ रुपये आणि अतिअवजड वाहनांसाठी (सात किंवा जास्त चाकांची वाहने) ११.१७ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे.

राज्यातील समृद्ध महामार्ग हा १२ जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग असणारा आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे जिल्ह्यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

PM Modi Birthday : ‘५६ इंच’ थाळी संपवा आणि जिंका ‘साडे आठ लाख’ रुपयांचं बक्षीस

नरेंद्र मोदी एक प्रभावशाली व्यक्तिमहत्व, वाचा प्रधान मंत्रींच्या संघर्षाचा प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version