spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Samruddhi Mahamarg दोन दिवस राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी खास तुमच्या साठी आहे.

तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी खास तुमच्या साठी आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर (Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) हा काही तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. पॉवर ग्रिड ट्रान्समीमिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे म्हणून हा रस्ता बंद करण्यात येणार आहे. जालना (Jalna) ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतुक मंगळवारी म्हणजेच आज दिनांक २१ नोव्हेंबर आणि बुधवार दिनांक २२ नोव्हेंबर असे दोन दिवस बंद असेल.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार २१ नोव्हेंबर, बुधवार २२ नोव्हेंबर, असे दोन दिवस दुपारी १२ ते ४ या वेळात होणार आहे. त्यामुळे या काळात वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर उर्वरित कालावधीत वाहतुक सुरळीत सुरु राहील. बंद कालावधीत पर्यायी मार्गावरुन वाहतुक वळविण्यात आली आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळविले आहे.

तर समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-14 या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल,असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक यांनी कळविले आहे. उर्वरीत कालावधीत वाहतुक सुरळीत सुरु राहिल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दोनही दिवस काम सुरु असलेल्या कालावधीत (दुपारी १२ ते ४) जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान, समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (IC-14) ते सावंगी इंटरचेंज (IC-16) दरम्यान नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतुक निधोना (जालना) इंटरचेंज IC-14 मधून बाहेर पडून निधोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग 753 A (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल.

हे ही वाचा:

प्रसादनं गळ्यात घातलं अमृताच्या नावाचं लॉकेट,फोटो सोशल मीडियावर व्हायरल

वानखेडे स्टेडियमवर फायनल का नव्हती? संजय राऊतांचा बोचरा सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss