बंजारा समाजाकडून संजय राठोड यांचे समर्थन

बंजारा समाजाकडून संजय राठोड यांचे समर्थन

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता सजंय राठोड यांना नवीन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेटमंत्रिपद देण्यात आले आहे. शिंदे व फडणवीस सरकार स्थापन झाल्या नंतर महाविकास आघाडी सरकारचे नेते संजय राठोड व राज्यसरकार वर ठीक करत होते. त्यात या मंत्रिमंडळात महिला नेत्यांना प्रतिनिधत्वदिले नसल्याने राज्याभरातून यावर निषेध केला जात होता. अशातच भाजप नेत्या चित्र वाघ यांनी देखील राठोड यांच्या मंत्रिपदाला विरोध दर्शवला होता. पण यात संजय राठोड यांचे समर्थक आणि पोहरादेवीच्या महंतांनी यांनी चित्र वाघ यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. “जेव्हा आमचे संत-महंत धर्मपीठावरून आदेश देतील, तेव्हा त्यांना महाराष्ट्रात फिरायला जागा मिळणार नाही. संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतर आरोप होत असेल तर, येणाऱ्या 2024 मध्ये त्यांची जागा दाखवू.” असा इशाराही महंतांनी यावेळी दिला. त्याच बरोबर त्यांनी 14 ऑगस्ट 2022 बंजारा समाजाची धर्मपरिषद होणार असलायची माहिती दिली.

या सगळ्या प्रकारातून एक गोष्ट ठळक दिसून येते ते म्हणजे संजय राठोड यांच्या मागे बंजाराचा मोठा पाठींबा आहे. हा बंजारा समजा नक्की काय आहे ? ते पोहरादेवीला का एवढा का मानतात हे या बाबत हि सविस्तर माहिती वाचा :
बंजारा समाज मुख्यत्वे वायव्य, पश्चिम आणि दक्षिण भारतात जास्त आढळतो. बंजारा, गोर, लंबाणी, लामण अशा पोटजाती या समाजामध्ये आहेत किंवा अशा वेगवेगळ्या नावानं हा समाज ओळखला जातो. तर राठोड, नाईक, पवार, जाधव, तवर, चव्हाण, आडे अशी आडनावं या समाजामध्ये आढळतात. महाराष्ट्राच्या जातींच्या यादीत बंजारा समाज म्हणजेच विमुक्त जमाती या प्रवर्गात येतो, ज्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण आहे. देशात जातनिहाय जनगणना झालेली नसल्याने राजकीयदृष्या कुठला समाज जास्त वरचढ आहे हे सांगणं कठीण आहे. बंजारा समाज महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी असल्याचंही दिसून आलं आहे. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री बंजारा समाजानं महाराष्ट्राला दिले आहेत. शिवाय राजेश राठोड, हरिभाऊ राठोड, संजय राठोड असे वेगवेगळे नेते या समाजातून येतात.पण बंजारा समाज मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बंजारा समाजाचं नेतृत्व आणि प्रतिनिधित्व दिसून येतं.

अडीच वर्षात पाच वर्षांची कामे करायचीत : देवेंद्र फडणवीस

पोहरादेवी बंजारा समाजचे धार्मिक स्थळ

पोहरादेवी या स्थळाला बंजारा समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे. बंजारा समाजाची काशी म्हणूनही पोहरादेवीला ओळखलं जातं. महाराष्ट्रातल्या वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यात पोहरा हे ठिकाण आहे. पोहरा इथं जगदंबा देवीचं मंदिर आहे. जे पोहरादेवी नावानं ओळखलं जातं.

महत्त्वाचं म्हणजे बंजारा समाजातील संत सेवालाल महाराज यांची इथं समाधी आहे. सेवालाल महाराज यांनी सांगितलेलं तत्वज्ञान बंजारा समाजात सर्वोच्च मानलं जातं. पोहरामध्ये जगदंबा मंदिर आणि सेवालाल महाराज यांची समाधी समोरासमोर आहे. महत्त्वाच्या सर्व हिंदू सणांना पोहरामध्ये बंजारा समाजाचे लोक मोठ्या संख्येनं एकत्र येतात. पोहरा हे बंजारा समाजाचं मुख्य धर्मपीठ आहे. इथून जारी होणाऱ्या संदेशाचं बंजारा समाजात अनुकरण केलं जातं. बंजारा समाजासाठी पोहरादेवीच महत्व किती आहे हे या विदेओ मधून आपल्याला नक्कीच समजले असेल.

हेही वाचा : 

“हर घर तिरंगा” चे प्रमाणपत्र कसे कराल डाउनलोड ?

Exit mobile version