spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊतांनी केला सवाल, बिहारला पूरस्थितीसाठी १८ हजार कोटी, मग महाराष्ट्रातील पूर दिसत नाही का?

राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर राज्यात अजूनही कायम आहे. पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर राज्यात अजूनही कायम आहे. पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या पुण्यात पावसाची (Pune Rain) तुफान बॅटिंग सुरु आहे. सिंहगड रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरलं आहे. दरम्यान, आज देखील पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज पुण्यात पावसाचा रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील पुणे, सातारा, रायगड, पालघर, सांगली या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

“महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय अस म्हणणार नाही, तर भयंकर पूर परिस्थिती निर्माण झालीय. धोक्याची पातळी ओलांडून पुढे गेली आहे. कालच्या बजेटमध्ये पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी बिहारला १८ हजार कोटी दिले. या सरकारला, या बजेटची वाहवा करणाऱ्या राज्यातील नेत्यांना सवाल आहे, त्यांना राज्यातील पूर दिसत नाही का?” असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचारला. “बिहारला 18 हजार कोटी दिले, आम्हाला 18 कोटी तरी द्या, अशी म्हणायची हिम्मत यांच्यात आहे का?” असं संजय राऊत म्हणाले. “महाराष्ट्राला या परिस्थतीचा सामना करण्यासाठी दमडी पण दिली नाही. पण पेन्सिल घेऊन बसलेले यावर बोलतील का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

 

“क्लिप बनवणं हे भाजपला जमतं. फोन चोरून ऐकले अशा महिला पोलीस अधिकाऱ्याला फडणवीस यांनी पोलिस महासंचालक केलं. त्यांच्याकडून काय अपेक्षा करता?” असं राऊत म्हणाले. “राज्याच्या राजकीय संस्कृतीच अधिपतन फडणवीस आणि त्यांच्या टोळीने केलं. नरेंद्र मोदी जसे नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान आहेत, तसे राज्याला नॉन बायोलॉजिकाल गृहमंत्री लाभले आहेत. असं घाणेरड राजकारण या देशात अमित शाह आणि राज्यात फडणवीस यांचा उदय झाल्यापासून सुरू झालं” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “ज्यांना अटक करावी ते संसदेत बसले आहेत. ज्यांना तुरुंगात पाठवायला पाहिजे, त्यांना भाजपने पक्षात घेऊन मंत्री, खासदार केलय. न्याय यंत्रणा नादान झालीय, हे केजरीवाल यांच्या प्रकरणातून दिसून येतय” असं संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

SANKASHTI CHATURTHI 2024: जाणूयात संकष्टी चतुर्थी विषयीची महती ; उपवास कसा करावा ते उपवास कसा सोडावा..

MCA ELECTION : अजिंक्य नाईक ठरले MCA च्या नव्या अध्यक्षपदाच्या विजयाचे मानकरी..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss