अब्रुनुकसानीच्या खटल्यात Sanjay Raut दोषी, न्यायालयाने ठोठावली १५ दिवसांची कैद; Megha Somaiya यांच्याविरोधात केले होते ‘शौचालय’ घोटाळ्याचे आरोप

अब्रुनुकसानीच्या खटल्यात Sanjay Raut दोषी, न्यायालयाने ठोठावली १५ दिवसांची कैद; Megha Somaiya यांच्याविरोधात केले होते ‘शौचालय’ घोटाळ्याचे आरोप

शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत मोठी बातमी आली असून न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची कैद सुनावण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची पत्नी मेघा सोमय्या (Megha Somaiya) यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात न्यायालयाने मोठा निर्णय देत संजय राऊत यांना दोषी ठरवले आहे. शिवडी न्यायालयाने हा निर्णय दिला असून संजय राऊत यांना १५ दिवसांच्या कैदेसह २५ हज़ार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मीरा भाईंदर महापालिकेतील (Mira Bhayandar Municipaal Corporation) शौचालय भ्रष्टाचार प्रकरणावरून संजय राऊत यांनी मेघा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. त्यावर मेघा सोमय्या यांनी राऊतांविरुद्ध कोर्टात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता.

२०२२ साली संजय राऊत यांनी मेघा सोमय्या यांच्यावर मीरा भाईंदर येथील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याआचा आरोप केला होता. याविरोधात मेघा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसाणीचा खटला दाखल केला होता. या निकालाची सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखून ठेवण्यात आलं होता. आज (गुरुवार, २६ सप्टेंबर) या प्रकारणाचा निकाल लागला आणि न्यायालयाने संजय राऊतांना दोषी ठरवले. न्यायालयाने संजय राऊतांना २५ हजारांचा दंड आणि १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असला तरी १५ दिवसांची कैद असल्याने संजय राऊत जामिनास पात्र आहेत. सुनावणीदरम्यान संजय राऊत कोर्टात उपस्थित नव्हते. परंतु कोर्टाने नियोजित वेळेत निकलाचे वाचन पूर्ण केले. आता संजय राऊत यांना रीतसर न्यायालयासमोर हजर व्हावे लागेल. त्यानंतर कोर्ट त्यांना जमीन मंजूर करण्याची शक्यता आहे.

नेमके प्रकरण काय?

सांज राऊत यांनी २०२ साली मेघा सोमय्या यांच्यावर मीरा भाईंदर महापालिकेत शौचालय घोटाळा केल्याआचे आरोप केले होते. टायनानंतर किरीट सोमय्या यांनी या आरोपाचे पुरावे देण्याचे आव्हान संजय राऊत याना दिले होते. मात्र संजय राऊत यांनी कोणतेही पुरावे न दिल्याणे मेघ राऊत यांनी राऊतांवर १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला होता. याबाबत किरीट सोमया याणी मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तसेच मानहाणी आणि बदनामीची नोटीस राऊतांना दिली होती. एक रुपयाचाहि घोटाळा झाला नसताना, घोटाळ्याचे कोणतेही पुरावे नसताना संजय राऊत यांनी फक्त बदनामीसाठी हा अपप्रचार केला, असा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता.

हे ही वाचा:

PM Modi Pune Visit Cancelled: मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान मोदींचा Pune दौरा रद्द

Akshay Shinde Encounter: CM Eknath Shinde, Devendra Fadnavis स्वतःला सिंघम समजतात, पण त्यांनी पुरावा नष्ट करण्याचे काम केलं: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version