Sunday, July 7, 2024

Latest Posts

‘डुक्कर ज्याप्रमाणे चिखलात असतो..,’ CM Eknath Shinde यांच्या नोटिसीवर Sanjay Raut यांचे प्रत्युत्तर

एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या नोटिसीवर भाष्य करत ते म्हणाले, "भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या घटनाबाह्य सरकराने भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवली. खटला दाखल करावा असे माझे त्यांना आव्हान आहे,"

शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज (शनिवार, १ जून) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या नोटिसीवर भाष्य करत ते म्हणाले, “भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या घटनाबाह्य सरकराने भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवली. खटला दाखल करावा असे माझे त्यांना आव्हान आहे,”

संजय राऊत यावेळी म्हणाले, “डुक्कर ज्याप्रमाणे चिखलात असतो तसे हे भ्रष्टाचाराच्या चिखलातील डुक्करं आहेत. भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या घटनाबाह्य सरकारने भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवली. खटला दाखल करावा माझे त्यांना आव्हान आहे. संपूर्ण देश या सरकारला पन्नास खोके एकदम ओके या एकाच नावाने ओळखतो. महाराष्ट्राच्या निवडणुकीत या लोकांनी पैशांचा पाऊस पडला हे सत्य आहे. चार जून नंतर चक्र उलट फिरणार आहे तेव्हा बघू,आता मजा येणार आहे. मी सामनामध्ये जेव्हा अग्रलेख लिहितो तो रोखठोक असतो आणि त्याला सत्याचा आधार असतो. कितीही पैशांचा पाऊस पडला तरी देखील महाराष्ट्रात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना यश मिळणार नाही. पाडापाडीची लढाई हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे,आमची लढाई केवळ भारतीय जनता पक्षाबरोबरच आहे आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचा पराभव करणार आहोत.”

संजय राऊत यांनी (सोमवार, २६ मे) ‘सामना’ (Saamana) मध्ये लिहिलेल्या अग्रलेखात भाजपसह (BJP) महायुतीवर (Mahayuti) जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ‘रोखठोक’ या सदरात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत सांगितले, “दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले आणि त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील. एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान २५ ते ३० कोटी रुपये वाटले. अजित पवार (Ajit Pawar) यांचा एकही उमेदवार निवडुन येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले,” असे गंभीर आरोप त्यांनी केले.

त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली असून मानहानीचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे एक वृत्तवाहिनी पाहत असताना त्यांना ही बातमी कळली आणि संपादक म्हणून संजय राऊत चुकीची बातमी पसरवत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी हा लेख प्रसिद्ध केला असून संजय राऊत स्वतःच काल्पनिक घोटाळ्यासंबंधी वक्तव्य करत आहेत असे देखील म्हणाले आहेत. संजय राऊत यांनी केलेले सगळी वक्तव्य फक्त खोटीच नाही तर बदनामीकारक आणि निंदनीय आहेत. याचबरोबर संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यांवर एकनाथ शिंदे यांनी पुराव्यांची मागणी केली आहे.

हे ही वाचा:

Maharashtra Drought: राज्यात परिस्थिती भयाण मात्र CM Eknath Shinde सुट्टीवर: Arvind Sawant

शेतकऱ्यांच्या अडचणीत Maha Govt नॅाट रिचेबल, Nana Patole यांचा मराठवाड्यात दुष्काळी पाहणी दौरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss