Thursday, July 4, 2024

Latest Posts

कॅमेरा लावून कोण ध्यानधारणा करतं? PM Modi यांच्या ध्यानधारणेवर Sanjay Raut यांची टीका

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत म्हणाले, "कॅमेरा लावून कोण ध्यानधारणा करतात? या कुंभकर्णाला चार जूननंतर जागं करू," असे ते म्हणाले.

शिवसेना उबाठा (Shivsena UBT) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज (शनिवार, १ जून) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी देशातील वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कन्याकुमारी येथे करत असलेल्या ध्यानधारणेवर त्यांनी टीका केली. पंतप्रधान मोदींवर टीका करत ते म्हणाले, “कॅमेरा लावून कोण ध्यानधारणा करतात? या कुंभकर्णाला चार जूननंतर जागं करू,” असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तामिळनाडू येथील कन्याकुमारी येथे ध्यानधारणा करत आहेत. त्यांच्या ध्यानधारणा करत असलेले छायाचित्र सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता संजय राऊत यांनीही यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. संजय राऊत म्हणाले, “कॅमेरा लावून कोण ध्यान धारणा करतात? कुंभकर्णाला चार जूननंतर जागं करू. पूर्वीच्या लोकांनी ध्यान धारणा करताना किती सिक्युरिटी वापरली होती? ३००० सुरक्षा रक्षक हाताशी पकडुन हे ध्यान करत आहेत,” अश्या मिशिक्ल शब्दांत त्यांनी टीका केली.

पुढे ते म्हणाले, “निवडणूक आयोगाला (Election Commission) हाताशी पकडुन आपल्या सोयीच्या तारखा घेतल्या आहेत. राजकारणातील सेलिब्रिटी यांच्या तारखा बघून मुद्दामून मोदींनी स्वतःची निवडणूक शेवट ठेवली आहे. निवडणूक आयोगाकडे मोदींची तक्रार करा. टिव्हीवर ध्यान धारणा दाखवत आहेत. कॅमेरा लावून ध्यानधारणा करतात अशी ध्यान धारणा कोण करते ? असा सवाल त्यांनी विचारला.

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबत बोलत संजय राऊत म्हणाले, “आम्ही सगळे राहुल गांधींच्या बाजूने आहोत. मुद्दाम राहुल गांधी याना बदनाम करण्यात आला आहे. या निवडणुकीत त्यांनी फार मेहनत केली आहे ते आपण सगळ्यांनी पाहिले आहे त्यामुळे त्यांना आमचा पाठिंबा असेल.”

हे ही वाचा:

Maharashtra Drought: राज्यात परिस्थिती भयाण मात्र CM Eknath Shinde सुट्टीवर: Arvind Sawant

शेतकऱ्यांच्या अडचणीत Maha Govt नॅाट रिचेबल, Nana Patole यांचा मराठवाड्यात दुष्काळी पाहणी दौरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss