नाशिकमध्ये संजय राऊत यांची जोरदार फटकेबाजी

शिवसेनेचे नेते तथा उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख संजय राऊत (Sanjay Raut) हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असून नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी विशेष संवाद मेळावा (Samvad Melava) आयोजित करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये संजय राऊत यांची जोरदार फटकेबाजी

शिवसेनेचे नेते तथा उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख संजय राऊत (Sanjay Raut) हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असून नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी विशेष संवाद मेळावा (Samvad Melava) आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांशी ते वन टू वन चर्चा करणार आहेत. त्यामुळे संजय राऊत यांचा आजचा दौरा महत्वाचा ठरणार आहे. दौऱ्याच्या सुरवातीलाच त्यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरत गोलंदाजास धु धु धुतले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी देखील टाळ्यांची बरसात केली. पहिल्या बॉलवर चेंडू सीमारेषेबाहेर तर दुसरा चेंडू थेट मैदानाबाहेर पाठवत क्रिकेटच्या मैदानातही त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सामनाच्या अग्रलेखातनं किंवा आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोधकांना ते चांगलेच फटकारे लगावत असतात. राजकारणात शब्दांची फटकेबाजी करणं हे कौशल्य असतं आणि शब्दांची फटकेबाजी संजय राऊत कायम करत असतात. आणि बॅट आणि बॉल सोबत खरी खरी फटकेबाजी संजय राऊतनी केल्याचं पाहायला मिळाल.

आज ते खऱ्याखुऱ्या क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरल्याचे पाहायला मिळाले. नाशिकचा हा दौरा शिवसेनेसाठी विशेष महत्त्वाचा असणार आहे कारण शिवसेनेचे ठाकरे गटातनं शिंदे गटात आउटगोइंग होण्याची शक्यता जास्त आहे. मतभेद , नाराजी आहेत ही सगळी नाराजी थोपवायची आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे गटाची बांधणी भक्कमरित्या करण्याचा आव्हानसुद्धा संजय राऊत यांच्यासमोर असेल. त्यांना जामीन मिळाल्यानंतरचा त्यांचा पहिलाच राज्यातला दौरा आहे. या दौऱ्या दरम्यानच क्रिकेट खेळण्याचा आनंद संजय राऊत लुटला आहे.

यानंतर ते शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. नाशिक दौऱ्यावरती असताना अनेक आव्हान त्यांच्या समोर आहेत. पक्षाची बांधणी करणे, शिवसेनेत फूट पडल्यानंतर अर्थात नाशिकमध्ये सुद्धा शिवसेनेत दोन गट पाहायला मिळतात. महापालिकेच्या निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात. त्या दृष्टीने सुद्धा ठाकरे गट मजबूत करणं, नाराजी दूर करण या सर्व बाबींकडे संजय राऊत त्यांना लक्ष द्यावे लागणार असल्याचे दिसते.

हे ही वाचा : 

अजित पवारांनी घेतला राज ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार

राज्यातील चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्क सोन्याची खाणी, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शोधमोहीम सुरु

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version