एसटी बँकेच्या संचालक पदावरून सौरव पाटील यांची हकालपट्टी, सदावर्तेंना मोठा धक्का

एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकारआयुक्तानी (commissioner for cooperation and registrar cooperative societies maharashtra) मोठा दणका दिला आहे.

एसटी बँकेच्या संचालक पदावरून सौरव  पाटील यांची हकालपट्टी, सदावर्तेंना मोठा धक्का

एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकारआयुक्तानी (commissioner for cooperation and registrar cooperative societies maharashtra) मोठा दणका दिला आहे. एकही पात्रता निकष पूर्ण न करता आल्यामुळे पदावरून त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी सौरव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. ते गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांचे जवळचे नातेवाईक आहेत. आरबीआयची पूर्व परवानगी न घेताच पदावर बसवल्यामुळे सहकार खात्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता सौरव पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

एसटी बँकेच्या संचालक व्यवस्थापक पदी सौरव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. सौरव पाटील यांची पात्रता निकषाची पुर्तता होत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बँकेच्या व्यवस्थापकीय पदावर बसण्यासाठी आठ वर्षाचा अनुभव लागतो. तसेच वयाची ३५ वर्ष पूर्ण लागतात. पण सौरव पाटील यांचे वय २५ च्या आसपास आहे. त्यांना आठ वर्षाचा अनुभव देखील नाही. शिवाय या पदावर बसण्यासाठी आरबीआयची परवानगी घेणे ही बंधनकारक आहे. पण सौरव यातील कोणत्याही निकषात बसत नव्हते. तरीसुद्धा त्यांची पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे अखेर आता सहकार विभागाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. मागील तीन ते चार महिन्यात या प्रकरणाबाबत अनेक घडामोडी घडल्या आहेत. बँकेतील अनेक ठेवी काढण्यात देखील आल्या आहेत. अंदाजे ४८० कोटी रुपये ठेवी काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसटी बँकेच्या संचलाक मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर आता सहकार आयुक्तांनी एसटी बँकेला पत्र लिहून सौरव पाटील यांना पदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

सौरव पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हा गुणरत्न सदावर्तेनसाठी खूप मोठा धक्का आहे. त्यांचे नातेवाईक सौरव पाटील यांना पदावर बसवण्यात आले होते. पण ते कोणत्याही निकषात न बसल्यामुळे पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याआधी सहकार आयुक्तानी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.

हे ही वाचा:

भाजपने काँग्रेसवर केली सडकून टीका, एक ट्विट अन् पाच सवाल… थर्टी फर्स्टला मद्य पार्टी करणाऱ्यांसाठी एक दिवसांचा दारू परवाना असणे आवश्यक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version