spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आता कारमध्ये देखील सर्वाना सीट बेल्ट बंधनकारक – नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Roads, Transport Minister Nitin Gadkari ) यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे.

केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Roads, Transport Minister Nitin Gadkari ) यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, आता कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सीट बेल्ट लावावा लागेल, म्हणजेच आता कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल.

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या नंतर नितीन गडकरी यांनी हा निर्णय घेतला आहे. वेगाने धावणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्याची आणि मागे बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्टचा वापर अनिवार्य करण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अपघात होऊ नयेत यासाठी रस्त्यांची योग्य आखणी करावी, यावरही त्यांनी भर दिला आहे. सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघातामुळे मी ठरवले आहे की, ड्रायव्हरच्या सीटप्रमाणेच मागील सीटवरील सीट बेल्टचा अलार्म असेल. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास एक हजाराचा दंड आकारला जाईल. मी या संबंधित फाइलवर सही केली. असे ही गडकरी म्हणाले.

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, केंद्रीय मोटार वाहन नियम (CMVR) च्या नियम १३८ (३) अंतर्गत, मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास १,००० रुपये दंड आकारला जाऊ शकतो. हा नियम सर्वांसाठी अनिवार्य आहे, हे बहुतांश लोकांना माहिती नाही. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट न घातल्याने वाहतूक पोलिसही दंड आकारत नाहीत. तसेच ५ सीटर कारमध्ये मागे बसणाऱ्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. ज्या ७ सीटर कारमध्ये मागच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांचे चेहरे पुढच्या बाजूस असतात, तिथेही सीट बेल्ट लावणे आवश्यक करण्यात आले आहे. पुढे गडकरी म्हणाले की, देशात वर्षभरात ५००,००० रस्ते अपघातांचा विक्रम समोर आला आहे. ते पाहून मला आश्चर्य वाटते. ६० टक्के रस्ते अपघातांमध्ये १८ – ३४ वयोगटातील लोकांचा समावेश आहे.

हे ही वाचा :- 

आज नीट युजी २०२२ चा निकाल होणार जाहीर

अँम्ब्युलन्सला देखील अमित शाहांच्या जाण्याची पहावी लागली वाट; व्हिडिओ मोठ्या प्रमाणत व्हायरल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss