नाशिक कोर्टाकडून खळबळजनक खुलासा, बाबरी मशीद पाडण्याचा PFI चा कट

नाशिक कोर्टाकडून खळबळजनक खुलासा, बाबरी मशीद पाडण्याचा PFI चा कट

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय(PFI) या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना देशविरोधी कारवाईच्या आरोपाखाली एटीएसने ताब्यात घेतले आहे. या संघटनेशी संबंधित धक्कादाक खुलासे सुनावणीदरम्यान पुढे येत आहेत. दरम्यान, २२ सप्टेंबर २०२२ रोजी एटीएसने देशासह राज्यराज्यात छापे मारुन पीएफआयशी संबंधित पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यामध्ये महाराष्ट्रातील मालेगाव येथून एक, कोल्हापूर येथून एक, पुण्यातून दोन आणि बीडमधून एकाला ताब्यात घेतले. या सर्वांना काल नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यासंदर्भात इतर मुस्लिमबहुल देशांमधील सदस्यांसोबत या संस्थेचे कार्यकर्ते संपर्कात होते असा दावा सरकारी वकिलांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयासमोर केला आहे.

हेही वाचा : 

संजय राऊत तुरुंगातूनही काडी पेटवतात; शहाजीबापूंचा टोला

अयोध्येतील राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशिद उभारण्याचा कट रचला होता अशी माहिती नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी ही माहिती दिली आहे. संपूर्ण भारत देश मुस्लिम राष्ट्र बनवण्यासाठी बाबरी मशिद पुन्हा उभारण्याचा डाव असल्याचं एनआयच्या तपासातून समोर आलं आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणी केलेल्या छापेमारीत शेकडो पीएफआयच्या कार्यकर्त्यांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलं होतं.

तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईत आरोपींचे मोबाईल,लॅपटॉप, हार्ड डिस्क जप्त करण्यात आले होते. त्यातून एटीएसला महत्त्वाच्या बाबी समजल्या आहेत. आरोपी परवेझ खान याने औरंगाबादेतील जटवाडा रोड, पडेगाव आणि नारेगाव येथे निर्जनस्थळी बंद शेडमध्ये दहशतवादी प्रशिक्षण दिल्याचा दावा एटीएसने न्यायलयात केला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने पीएफआयवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी भाजपच्या टार्गेटवर, आ.रोहित पवारांचा गंभीर आरोप

दरम्यान, न्यायालयाने या संशयितांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एटीएसने मात्र अधिक तपासासाठी चार दिवसांची पोलिस कोठडी राखून ठेवली आहे.

ऐन सणासुदीला नागरिक त्रस्त! गोकुळ दुधात दरवाढ, जाणून घ्या नवे दर

Exit mobile version