spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आर्यन खानला मोठा दिलासा, पासपोर्ट परत देण्याचे सत्र न्यायालयाचे आदेश

गेल्या वर्षी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा क्रूज ड्रग्स प्रकरणात अडकला होता.

गेल्या वर्षी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा क्रूज ड्रग्स प्रकरणात अडकला होता. त्यामुळे त्याला 3 ऑक्टोबर 2021 रोजी ताब्यात घेण्यात आले होते. यात आर्यनला 28 दिवसांचा त्याला तुरुंगवास भोगाव लागला होता. अनेक महिन्यांच्या कायदेशीर लढाईनंतर एनसीबीने गेल्या महिन्यात आर्यन खानला क्लीनचिट दिली.

पुराव्या अभावी आर्यनला या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. यानंतर आर्यने विशेष न्यायालयाकडे पासपोर्ट परत मागण्याची मागणी केली होती. आणि सत्र न्यायालयाच्या सुनावणीत आर्यन खानला त्याचा पासपोर्ट परत परत देण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : 

निमिषा सजयनचा पहिला मराठी चित्रपट “हवाहवाई

३० जून रोजी आर्यने विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये त्याने कोर्टाकडे आपला पासपोर्ट परत मागण्याची विनंती केली होती या दरम्यान एनसीबीने न्यायालयाला सांगितले की पासपोर्ट परत करण्यास आणि जामीन बॉण्ड रद्द करण्यास त्यांचा कोणताही आक्षेप नाही याचिकेवर सुनावणी करताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विविध पाटील यांनी शाहरुख खानचा मुलाला त्याचा पासपोर्ट परत देण्याचे आदेश दिले.

मुंबईहून गोव्याला जाणारी कॉर्डिलिया सुवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबी कडून धार टाकण्यात आली होती. या कारवाईमध्ये एनसीबीला मोठ्या प्रमाणात ड्रग सापडले. आणि या प्रकरणात आर्यन खानला आणि त्याच्या मित्रांना असे एकूण वीस जणांना ताब्यात घेण्यात आले होते हे प्रकरण देशभर गाजले होते त्यानंतर आर्यन खानला सहा महिन्यांनी क्लीन शीट मिळाली.

जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली

Latest Posts

Don't Miss