spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लम्पीपासून जनावरांचा बचाव करण्यासाठी आता क्वारंटाईन सेंटर उभारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगाने पसरत असलेल्या जनावरांच्या लम्पी स्कीन आजारा संदर्भात एक टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. जनावरांमध्ये रोगाची वाढती संख्या पाहाता आणि पुढील धोका ओळखून शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांच्या अनेक टीकेनंतर आज अखेर मुख्यमंत्री यांना मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी स्कीन रोगाला रोखण्यासाठी जनावरांसाठी आता क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासोबत, लम्पी स्कीन आजारांमुळे मृत पावलेल्या जनावरांचा मोबदला त्या शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा : 

यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मोकळे?

औरंगाबादमधील विनोद पाटील यांनी लम्पी स्कीन आजाराचा धोका ओळखून क्वारंटाईन सेंटर उभारण्याची मागणी केली होती. याचा मागणीचा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी आज क्वारंटाईन सेंटर उभारण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, लम्पी रोग राज्यातील जवळपास २२ जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. ज्या ठिकाणी लम्पी रोगाची लागण झालेली आहे त्या ठिकाणाहून पाच किमीच्या परिघात सर्व जनावरांचं लसीकरण केलं जाणार आहे. त्याचबरोबर
टास्क फोर्सची स्थापना करण्याचे देखील आदेश मुख्यमंत्री दिले. राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय टास्क फोर्सची स्थापन करण्यात आील आहे. लम्पी रोग अटोक्यात आणण्यासाठी नियमित आढावा घेऊन त्यावर उपाययोजना आणि शिफारस हे टास्क फोर्स करणार आहे.

Navratri 2022 : काय आहे नवरात्रातील अखंड ज्योतचं महत्व ? घ्या जाणून

लम्पी आजारा विषयी माहिती :

लम्पी स्किन डिसीज हा वेगानं पसरू शकतो. ऑर्थ्रोपॉड व्हेक्टर म्हणजेच ऑर्थ्रोपोडा गटातले कीटक हे या रोगाच्या प्रसाराचं प्रमुख साधन आहे, असं `डब्ल्यूओएएच`नं म्हटलं आहे. संसर्गग्रस्त जनावरांशी थेट संपर्कामुळे होणारा विषाणू प्रसार तुलनेने किरकोळ असतो. या आजाराचा संसर्ग खाद्य, संसर्गग्रस्त जनावराची लाळ किंवा दूषित पाणी पिणं यासारख्या गोष्टींमुळे होतो की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी हे मार्ग संसर्गासाठी कारणीभूत ठरू शकतात. जनावरांपासून जनावरांना संसर्ग पसरण्याचा विचार केला, तर एकदा जनावरं या संसर्गातून बरी झाली की ती सुरक्षित मानली जातात. त्यामुळे ती इतर जनावरांसाठी संसर्गाचा स्रोत ठरू शकत नाही. ज्या संसर्ग झालेल्या जनावरांमध्ये क्लिनिकल लक्षणं दिसत नाहीत, अशा जनावरांच्या रक्तात काही आठवडे विषाणू राहू शकतो.

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरून प्रवास करायचा? घ्या जाणून टोलची रक्कम…

Latest Posts

Don't Miss