spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यात आयोजित केलं अजब ‘सेक्स तंत्र’ प्रशिक्षण शिबीर,हिंदू महासभेचा विरोध

पुणे तिथे काय उणे ही म्हण प्रत्येक्षात उतरवण्याची पुणेकर नेहमीच तत्पर असतात. यावेळेस मात्र एका अजब जाहिरातीमुळे पुण्यात नवी चर्चा आणि वाद सुरु झाला आहे. पुण्यात ‘सेक्स तंत्र’ नावानं एक प्रशिक्षण शिबीर भरवण्यात येणार आहे. येत्या १ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान पुण्यात हे शिबीर होणार आहे. त्यासाठी प्रतिव्यक्ती तब्बल १५ हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. नवरात्री उत्सवाच्या प्राश्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहिरातीला सध्या जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मात्र या तीन दिवस पुण्यातील कॅम्पची जाहिरात आता वादाच्या कचाट्यात अडकली आहे. ही जाहिरात कोणी सोशल मीडियावर पसरवली याचा शोध पुणे सायबर पोलीस घेत आहेत.

आता सावंवाडी ते कणकवली धावणार ट्रेन? नारायण राणेंनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

खरं तर लैंगिक शिक्षणाची गरज अधोरेखित करण्याचा हा प्रकार असल्याचे भासवले जात आहे. लैंगिक शिक्षणाची गरज देखील काळाची गरज असल्याचे नाकारू शकत नाहीत. मात्र या जाहिरातीमधून वेगळाच प्रकार असल्याचे प्रतीत होत आहे. कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेत पुण्यात नक्की चाललंय तरी काय ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

हेही वाचा : 

कोठडीत असलेल्या संजय राऊतांच्या ‘या’ वक्तव्यावरून सोशल मीडियावर चर्चा

हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सेक्स तंत्र जाहिरातीला विरोध दर्शवत विकृत संस्कृतीची निर्मिती होऊ देणार नाही. हा गलिच्छ विकृत व्यवसाय आहे. हिंदू महासभा पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

अध्यक्ष आनंद दवे पुढे म्हणाले, “हा हिंदूंचा आणि त्यांच्या दैवतांचा अपमान आहे हे हिंदू महासंघ कदापि सहन करणार नाही. ना आयोजकांचा पत्ता ना नावे ना होणाऱ्या कार्यक्रमाचा पत्ता किंवा इतर कोणतीही माहिती. यावरूनच हे सर्व फसव, घाणेरडे आणि एका नवीन विकृत संस्कृती ला जन्म देणारे ठरणार आहे आणि हिंदू महासंघ हे होऊ देणार नाही. अशा शब्दात हिंदू महासभेने सेक्स तंत्र जाहिरातीला तीव्र विरोध दर्शवला आहे.

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

Latest Posts

Don't Miss