पवारांच्या घरावर हल्ला करणारे ST महामंडळाचे बडतर्फ झालेले कर्मचारी आजपासून पुन्हा सेवेत, सदावर्ते यांच्यासोबत जल्लोष

पवारांच्या घरावर हल्ला करणारे ST महामंडळाचे बडतर्फ झालेले कर्मचारी आजपासून पुन्हा सेवेत, सदावर्ते यांच्यासोबत जल्लोष

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी एसटी महामंडळाने ११८ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं होतं. या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सेवेत घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत एसटी कर्मचाऱ्यांनी आपला आनंद व्यक्त केला त्याठिकाणी व्यक्त केला. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीही राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

हेही वाचा : 

Mumbai University Exams : मोठी बातमी ! मुंबई विद्यापीठातील पहिल्या सत्राच्या परीक्षेच्या सुधारित तारखा अखेर जाहीर

दरम्यान, या कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांनंतर पुन्हा सेवेत घेतलं जाणार असून पूर्वीच्याच जागी आणि पदावर कामावर रुजू करुन घेतलं जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे. या जल्लोषात अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी तसेच कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्ष अॅड. जयश्री पाटील या देखील सहभागी झाल्या होत्या. तर,याप्रसंगी सदावर्ते यांनी मागील सरकारवर तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर प्रचंड टीका केली. तर गुरुवारपासून सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या सरकारचे आभार मानले. तसेच सदावर्ते यांचे देखील आभार मानले.

शिळ्या पोळीपासून बनवा टेस्टी समोसा

एसटी संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील आठवड्यात दिले होते. एसटी महामंडळ यांच्यासह मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. संप काळात जवळपास ११८ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांना आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.

शिंदे सरकारच्या याच निर्णयाबद्दल शरद पवारांना काही दिवसांपूर्वी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना प्रश्न विचारला असता. या प्रश्नाला शरद पवार यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं. तुमच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करुन घेण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. याबद्दल काय सांगाल, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. त्यावर पवार यांनी अवघ्या पाच शब्दांमध्ये उत्तर दिलं. घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीवर घेण्याच्या निर्णयावरील प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी, “सरकारचा निर्णय आहे सरकारने ठरवावं,” अशी प्रतिक्रिया नोंदवली.

Diwali 2022 : दिवाळीत बनवा पारंपरिक पद्धतीने अनारसे…

Exit mobile version