spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मी फक्त या दोन मंदिरात जातो, Sharad Pawar यांनी केला खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांची कन्या व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आज (शनिवार, २७ जुलै) एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात उपस्थित होते. सध्या देशात या बाप-लेकीची जोडी गाजत आहे. या कार्यक्रमात या बापलेकीच्या जोडीने अनेक मुद्यांवर भाष्य करत असतानाच त्यांनी राजकारणातल्या गमतीजमती देखील सांगितल्या. सुप्रिया सुळेंनी राजकारणात केलेली एंट्री, त्यांचं बालपण, लग्न यावर शरद पवार यांनी गप्पा मारल्या. यावेळी शरद पवार यांनी ते कोणत्या मंदिरात जातात याचा खुलासादेखील केला.

शरद पवार यांनी यावेळी गप्पा मारताना मी दोन मंदिरात जात असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी दोन्ही मंदिरांची नावे देखील सांगितली. यावेळी ते म्हणाले, “मी दोन मंदिरात जातो, एक पंढरपूरला आणि एक बारामतीमध्ये असलेले गाव कन्हेरी. वडिलांपाठोपाठ श्रद्धेबाबत बोलत असताना सुप्रिया सुळे यांनीदेखील भाष्य केले. यावेळी त्या म्हणाल्या,”माझी श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही.”

पुढे गप्पा मारत असताना शरद पवार म्हणाले, “मी बुद्धिबळ चांगलं खेळतो असे नाही. मला वेळ मिळाला की खेळतो. खेळात उंट तिरका चालतो, राजकारणात उंट कोण आहे हे लक्षात ठेवावे लागते. अडीच घर चालणारा घोडा आपल्या बाजूला कोण आहे हे लक्षात ठेवावे लागते.

बीड आणि जालन्यातील स्थिती चिंताजनक, लवकरच दौरा करणार

शरद पवार म्हणाले,”बीड आणि जालना जिल्ह्यातील स्थिती फार चिंताजनक आहे. संसदेचं अधिवेशन संपवल्यावर आपण या दोन जिल्ह्यात जाऊन दोन्ही गटांशी संवाद साधू,” असे ते यावेळी म्हणाले. “राज्यात प्रथमच दोन गट पडले असून आजच्या राज्यकर्त्यांनीही दोन बाजू घेतल्या आहेत. हे योग्य नाही,” अशी टिका त्यांनी यावेळी केली.

शरद पवारांनी सांगितली सुप्रिया सुळेंच्या लग्नाचा खास किस्सा, जावई नेमका कसा शोधला?

बॅनर लाऊन मुख्यमंत्री होता येत नाही, जनतेच्या मनात असावं लागत, Pravin Darekar यांचा Uddhav Thackeray यांना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss