spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शरद पवारांनी सांगितली सुप्रिया सुळेंच्या लग्नाचा खास किस्सा, जावई नेमका कसा शोधला?

शरद पवार यांनी आपल्या मुलीवर आणि जावईवर भाष्य केलं आहे. आणि आपल्या भावना मांडल्या आहेत. जावई नेमका कसा शोधला? यावर भाष्य केलं आहे. करत अनेक भावना व्यक्त केल्या आहेत.

एबीपी माझाच्या महाकट्ट्यावर (Majha Mahakatta) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharadchandra Pawar Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या कन्या, खासदरा सुप्रीया सुळे (Supriya Sule) उपस्थित होते. या बापलेकीच्या जोडीनं कार्यक्रमात बोलताना बापलेकीच्या हळव्या नात्यासोबतच राजकारणातल्या (Maharashtra Politics) अनेक गमतीजमती सांगितल्या. तसेच, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्यही केलं. गेल्या कित्येक वर्षांपासून खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याही राजकारणातील एक अग्रणीचे नेते आहेत. कठीणातल्या कठीण राजकीय परिस्थितीत शरद पवार मोठ्या खुबीने मार्ग काढतात. त्यांना एक कसलेला राजकारणी म्हणून ओळखले जाते. शरद पवार यांना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या रुपात एकमेव कन्या आहेत. त्यांना मुलगा नाही. यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी आपल्या मुलीवर आणि जावईवर भाष्य केलं आहे. आणि आपल्या भावना मांडल्या आहेत. जावई नेमका कसा शोधला? यावर भाष्य केलं आहे. करत अनेक भावना व्यक्त केल्या आहेत.

शरद पवार यांनी त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्यावरही भाष्य केलं. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल सर्वांत अगोदर कधी अभिमान वाटला असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना “राष्ट्रीय पातळीवर सुप्रिया सुळे यांना संसदेत रिकग्निशन मिळतं तेव्हा आत्मिक समाधान मिळतं. कारण हे रिकग्निशन सर्वांना मिळत नाही,” अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या.

सुप्रियाच्या लग्नात माझा फारसा रोल नव्हता. बाळासाहेब ठाकरे, माधव आपटे यासारख्या काही जवळच्या मित्रांनी स्थळ सुचवलं होतं. माधव आपटे म्हणेज उद्योजक. या लोकांनी स्थळ सुचवलं होतं. माझ्या जावयांचे वडील आणि ते माधव आपटे मित्र होते. त्यामुळे हे स्थळ सुचवण्यात आलं. स्थळ सुचवल्यानंतर सुप्रिये सुळे आणि त्यांचे पती दोघेजण भेटले होते. साधारणत: जवळचे लोक सुचवतील तो जावाई, असं माझं सूत्र होतं, असं शरद पवार यांनी सांगितलं. तसेच सुप्रिया सुळे यांनीदेखील माझ्या लग्नात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे सांगितले. त्यांनी राज्यातील राजकारण, सामाजिक परिस्थितीवरही भाष्य केलं.

Uddhav Thakeray Birthday: रश्मी-उद्धव ठाकरे यांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे झाले? जाणून घ्या हा प्रेमप्रवास…

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे “धर्मवीर-२” चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले; निर्मात्यांचा अनोखा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss