spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दुग्धजन्य पदार्थांची आयात न करण्याची विनंती, दुग्धविकास मंत्री पुरूषोत्तम रूपालांना शरद पवारांचं पत्र

जगामधील सर्वांत मोठ्या दूध उत्पादक देश म्हणून आपल्या देशाचा गौरव झाला आता त्याच देशावर दुग्धजन्य पदार्थ बाहेरून आयात करण्याची वेळ आली आहे. याआधी सुद्धा २०११ मध्ये भारताने दुधजन्य दुग्धजन्य पदार्थाची बाहेर देशातून आयात करण्यात येत होती.

जगामधील सर्वांत मोठ्या दूध उत्पादक देश म्हणून आपल्या देशाचा गौरव झाला आता त्याच देशावर दुग्धजन्य पदार्थ बाहेरून आयात करण्याची वेळ आली आहे. याआधी सुद्धा २०११ मध्ये भारताने दुधजन्य दुग्धजन्य पदार्थाची बाहेर देशातून आयात करण्यात येत होती. आता देशामध्ये पुन्हा दुधाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरूषोत्तम रूपालांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये दुग्धजन्य पदार्थांची आयात न करण्याची विनंती केली आहे. भारतीय दूध उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होण्याची भीती पात्रातून व्यक्त केली आहे. देशामध्ये दुधापासून बनवलेल्या उपपदार्थांची आयात केली जाऊ शकते अशी शक्यता वाटल्यानंतर केंद्री माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी यासंदर्भात देशाने पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे.

मागील महिन्यात दुधाच्या दारात तब्बल १२ ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे तरी सुद्धा दुधाचे उत्पादन मात्र वाढत नाही म्हणून अखेर देशाला हा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुधाच्या उत्पादनात घट होण्याचे मुख्य म्हणजे लम्पी आहे. लम्पी आजारामुळे दुभत्या जनावरावर परिणाम झाला आहे. सध्याच्या स्थितीला दुधाची कमतरता जाणवत नसली तरी आगामी काळात मात्र दुग्धजन्य पदार्थाची कमतरता भासेल. मागच्या वर्षांमध्ये दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली नाही. लम्पी आजारामुळे देशभरातील जवळपास एक लाख ८९ हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर याच लम्पीमुळे मोठ्या प्रमाणात फक्त दुधाचे उत्पादन घातले नाही तर अनेक जनावरांनी प्रजनन क्षमता देखील कमी झाली आहे.

देशातील दुधाची सद्यस्थिती

मागच्या अनेक वर्षात पहिल्यांदा तब्बल सव्वा वर्षात १२ ते १५ टक्क्यांनी दुधाची भाववाढ झाली आहे
२०२१-२२ या वर्षांमध्ये देशातील दूध उत्पादक ६.२५ टक्क्यांनी वाढले
२०२१-२२ या आर्थिक वर्षांमध्ये २२१ दशलक्ष टन दुधाचे उत्पादन झाले आहे
२०२०-२१ या वर्षांमध्ये देशात दुधाचे उत्पादन २०८ टन झाले आहे
२०२२-२३ या आर्थिक वर्षांमध्ये देशातील दूध उत्पादनात कोणतीही वाढ झाली नाही

लम्पी आजारांमुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर बहुतांश पशु पालकांनी लम्पी आजाराच्या भीतीने पशुधन विकले आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसात दुधाचं उत्पादक वाढत नाही. त्यामुळे भविष्यामध्ये दुधाच्या उत्पादनात किती वाढ होते यावर सुद्धा बाहेरील देशातील दुग्धजन्य पदार्थ आयात करायचे का हे अवलंबून असणार आहे. देशामधील दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याची ही काही पहिली वेळ आहे याआधी २०११ मध्ये आपल्याकडे दुधजन्य पदार्थांची आयात करावी लागली होती आणि असेच परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवताना पाहायला मिळते आहे.

हे ही वाचा : 

नवनीत राणांच्या टीकेवर मनीषा कायंदे यांचे प्रत्युत्तर…

जागतिक आरोग्य संघटनेचा ७५ वा जागतिक आरोग्य दिन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार,आमदारांचा ९ एप्रिलला अयोध्या दौरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss