गणेशोत्सवानिमित्त पुण्यात शिंदे व ठाकरे सत्तासंघर्षाचा देखावा, परंतु पोलिसांनी परवानगी नाकारली

गणेशोत्सवानिमित्त पुण्यात शिंदे व ठाकरे सत्तासंघर्षाचा देखावा, परंतु पोलिसांनी परवानगी नाकारली

संपूर्ण महाराष्ट्रात दोन वर्षांनी ढोल ताश्यांसह गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. तर ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशमंडळाची तयारी सुरु झाली आहे. तर अशातच यंदाच्या गणपतीच्या देखाव्यावरुन वादावादीसुद्धा झाली मात्र पुण्यात आता राज्यातील सत्तासंघर्षाची कहाणी सांगणारा देखावासुद्धा बघायला मिळणार आहे. पुण्याचे प्रसिद्ध कलाकार सतीश तारु यांच्या स्टुडियोत हा देखावा तयार केला जात आहे.

हेही वाचा : 

‘चला दापोली’ किरीट सोमय्यांचा नवा नारा, मविआ नेत्या विरुद्ध आक्रमक पवित्रा

यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेणार होत्या मात्र, पोलिसांनी नकार दिल्यामुळे मंडळाकडून नवीन देखावा तयार करण्यात येणार आहे. तर कोणत्याही प्रकारचा राजकीय रंग देण्याचा आमचा हेतू नव्हता असं मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असताना पोलिसांकडून या देखाव्याची परवानगी नाकारली आहे.

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीवर शिंदे सरकारच्या नेत्याची प्रतिक्रिया

पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी लाखो रुपये खर्चकरुन पुण्यातील गणेश मंडळ जिवंत देखावे आणि देशातील विविध देवांची मंदिरं साकारण्याचा प्रयत्न करतात. हे सगळे देखावे पाहण्यासाठी आजूबाजूच्या शहरातील नागरीकसुद्धा पुण्यात गर्दी करतात. राजाराम मंडळात दरवर्षी देशातील महत्वाच्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येते. यंदा हे मंडळ तिरुपती बालाजीच्या मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे.

यंदा गणेशोत्सवनिम्मित द्या हटके शुभेच्छा !!!

Exit mobile version