शिंदे गटाचं ‘सोशल मीडिया स्ट्राईक’, प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण ठेवून व्यक्त केला आनंद

बऱ्याच दिवसापासून चालू असलेला महाराष्ट्रमधला प्रश्न म्हणजे नक्की शिवसेना (Shiv Sena) कोणाची? महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षवर अत्यंत महत्वपूर्ण निर्णय निवडणुक आयोगाने (Election Commissions) दिला आहे.

शिंदे गटाचं ‘सोशल मीडिया स्ट्राईक’, प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण ठेवून व्यक्त केला आनंद

बऱ्याच दिवसापासून चालू असलेला महाराष्ट्रमधला प्रश्न म्हणजे नक्की शिवसेना (Shiv Sena) कोणाची? महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षवर अत्यंत महत्वपूर्ण निर्णय निवडणुक आयोगाने (Election Commissions) दिला आहे. निवडणुक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव (Name) आणि शिवसेना पक्षाचे चिन्ह (symbol) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटाला दिले आहे. हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्यावर शिंदे गटामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी यांच्या सोशल मीडियाचे (Social media) प्रोफाइल पिक्चर (Profile picture) सुद्धा धनुष्यबाण ठेवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर सुद्धा त्यांचा प्रोफाइल पिक्चर सुद्धा बदलला आहे आणि धनुष्यबाण ठेवला आहे. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant), शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar), खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) या नेत्यांनी ट्विटरवरील प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण केले आहे.

प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण ठेवलेले शिंदे गटातील नेते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उद्योगमंत्री उदय सामंत
उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
खासदार श्रीकांत शिंदे
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर
कृषीमंत्री अब्दुल सत्तार
आरोग्य मंत्री तानाजी सावंत
बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्यामुळे शिंदे गटामधील सगळ्याच मंत्र्यानी ट्विटर आणि फेसबुक वर त्यांचा प्रोफाईल पिक्चर बदलून धनुष्यबाण ठेवला आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि शिवसेना पक्षाचे चिन्ह दिले आहे. त्यानंतर नेत्यांनी आधीचे प्रोफाईल पिक्चर काढून धनुष्यबाण ठेवले आहे आणि संपूर्ण शिंदे गट हा त्यांचा आनंद त्यांच्या सोशल मीडियाच्या द्व्यारे व्यक्त करत आहे.

हे ही वाचा:

Nepal Yeti Airlines Plane Crash, लँडिंगच्या अवघ्या १० सेकंदापूर्वीच प्लेन झाले क्रॅश

Sharad Pawar Live : शरद पवारांच्या हस्ते महाराष्ट्र केसरीचा सत्कार

Makar Sankranti 2023 , संक्रांतीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version