Shiv bhojan Thali : राज्यात शिवभोजन थाळी बंद होणार ?

महाविकास आघाडीच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी (Shiv bhojan Thali) बंद होण्याची चर्चा सध्या राज्यभर रंगत आहे. शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला आहे.

Shiv bhojan Thali : राज्यात शिवभोजन थाळी बंद होणार ?

महाविकास आघाडीच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी (Shiv bhojan Thali) बंद होण्याची चर्चा सध्या राज्यभर रंगत आहे. शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

गरिबांना, गरजूंनाा सहज व कमी दरात भोजन उपलब्ध करण्यासाठी राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले होते. शिवभोजन थाळी केंद्र स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, हॉटेल चालक आदींना चालवण्यासाठी देण्यात आली आहेत. शिवभोजन थाळी केंद्र चालकांना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. शिवभोजन थाळीत एक वाटी भाजी, दोन चपात्या, भात व वरणाचा समावेश आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली आहे. तर काही निर्णया बदल करण्यात आला आहे. दरम्यान, आता राज्यातील शिवभोजन थाळी योजना बंदी वर चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात प्रस्ताव मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे. मात्र, त्यावर शिंदे सरकारने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मंत्रीमंडळ बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार आहे. या योजनेतंर्गत राज्यातील जनतेला १० रुपयांत जेवण मिळत होते. कोरोना काळात याची किंमत ५ रुपये करण्यात आली होती. या योजनेमुळे गरिबांना मोठा आधार मिळत होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. राज्यात एक लाख ८८ हजार ४६३ एवढ्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून विविध मदत दिली जाते.

सध्या राज्यात एक लाख ८८ हजार ४६३ एवढ्या थाळ्यांची विक्री होते. याची संख्या दोन लाखांपर्यंत नेण्यासाठी ठाकरे सरकारने प्रस्ताव आणला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हा प्रस्ताव शिंदे सरकारसमोर आला. मात्र, त्यावर शिंदे सरकारने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मंत्रीमंडळ बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव तापाने फणफणला होता, व्हिडीओ झाला व्हायरल

आमदार संतोष बांगर यांच्या ताफा शिवसैनिकांनी अडवला, ‘माझ्यावर हल्ला करणाऱ्यांचे तुकडे करणार’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version