Sunday, September 29, 2024

Latest Posts

Dasara Melava : नाशिक महामार्गावर महिला शिवसैनिकांडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना दिला चोप

बहुप्रतीक्षित असलेला राज्यातील शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा आज संध्याकाळी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर, आता यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव काय बोलणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. शिंदे यांच्या गटाचाही दसरा मेळावा बीकेसी येथे पार पडणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी शिंदे गटाकडून केलीय. या मेळाव्याला राज्यभरातून ३ लाख लोक उपस्थित राहतील असा दावा करण्यात आलाय. यासाठी बस ट्रेन बूक करण्यात आल्या आहेत. ठाकरे गटाच्या मेळावासाठी नाशिकहून काही महिला शिवसैकिनांची बस मुंबईच्या दिशेने येत असताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अश्लील चाळे केल्याचा धक्का दायक प्रकार समोर आला आहे.

हेही वाचा : 

‘मी थकणार नाही मी झुकणार नाही… ‘, मेळाव्यात पंकजा मुंडेंची तोफ कडाडली

नाशिक- मुंबई महामार्गावरून महिला शिवसैनिकांची बस जाताना त्याच मार्गावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांची जीप जात होती. शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी चालत्या वाहनातून अश्लील इशारे केल्याचा आरोप ठाकरे गटातील महिला शिवसैनिकांनी केला आहे. पुढे जाऊन शिंदेंच्या कार्यकर्त्यांची गाडी अडवत महिला शिवसैनिकांनी त्या पुरुषाना चांगला चोप दिल्याचे समोर आले.

दसरा मेळाव्यासाठी एसटी बसेस आरक्षित करताना शिंदे गटाकडू १० कोटी रुपये रोख दिल्याचे समजते आहे, ही रक्कम शिवसेना पक्षाच्या खात्यातून दिली आहे का, नसेल तर ही रक्कम कुठून आणली, १० कोटींचा रोख व्यवहार कसा केला, शिंदे यांच्या पक्षाची अजून अधिकृत नोंदणीही झालेली नाही, मग हा पैसा कोणत्या खात्यातून आला, हा आर्थिक गैरव्यवहार नाही का, असे प्रश्न महाराष्ट्र काँग्रेस कमिटीमधील नेत्यांनी उपस्थित केले आहेत.

दसरा मेळाव्याआधीच रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट म्हणाले, बाळासाहेबांच्या निधनानंतर…

Latest Posts

Don't Miss