Shivsena : विदर्भातील निर्भया प्रकरणावरून शिवसेना आक्रमक, महिला नेत्यांनी घेतली पिडीतेची भेट

Shivsena : विदर्भातील निर्भया प्रकरणावरून शिवसेना आक्रमक, महिला नेत्यांनी घेतली पिडीतेची भेट

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील एका महिलेवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी चौकशीसाठी शिवसेनेतील महिला नेत्या व अधिकारी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. घरगुती वादातून एकटीच माहेरी जाण्यासाठी निघालेल्या महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेऊन 3 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर येताच, शिवसेनेतील आमदार मनीषा कायंदे, सुषमा अंधारे आणि संजना घाडी यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

या संदर्भात अधिकाची माहिती देण्यसाठी अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शना खाली शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यांनी यात म्हटले, “तिकडे जी दुर्दैवी घटना घडली ती वाईट आहे. अन्नाच्या शोधात ती महिला पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली. तिला वेळीच अडवले असते तर अनर्थ टळला असता. परंतु पोलीस चोकीत पोलिसांची नसल्यामुळे तिच्यावर पुन्हा एकदा दुसरा अतिप्रसंग घटला. या काळात पोलीस ठाण्यात पोलीस पोलिस अधीक्षक असल्याची मिळाली. 30 तारखेला ती घराबाहेर पडली. त्यावेळी तिच्यावर पहिला अतिप्रसंग घडला. श्रीराम उरकुडे असे त्या आरोपीचे नाव आहे, तो अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाही, असे त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण ? 

पीडित महिला ही गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून, ती पतीपासून विभक्त झाल्यामुळे सावराटोली येथे बहिणीकडे राहत होती. बहिणीसोबत क्षुल्लक कारणावरून भांडण झाल्याने ती आपल्या माहेरी जाण्यासाठी एकटीच निघाली होती. रस्त्यात भेटलेल्या आरोपीने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने वाहनात बसवून मुंडीपार जंगलात नेले. 30 जुलैपासून 2 दिवस त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. 30 आणि 31 तारखेला अत्याचार पीडित महिला एका हायवेवरील पुलाखाली सापडली. तिला लाखनी गावच्या महिला पोलीस पाटीलने तिला लाखनी पोलीस स्टेशनला आणले. तिथे अगोदरच एका केसच्या संदर्भात कर्मचारी तपास करत होते. त्यामुळे अपुरे मनुष्यबळ पोलीस स्टेशनमध्ये होते. त्यात ही महिला दोन दिवसांपासून उपाशी असल्याने तीन पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली. तिला कोणी अडवायलाही नव्हते. अशा परिस्थितीत 1 तारखेला एका ढाब्याजवळ ती गेली. तिथे मद्यपान केलेली काही माणसे होती. त्यात लुक्का उर्फ अमित सारवे आणि नजीर अहमद अन्सारी या दोघांनी तिला उचलले, जंगलात नेले आणि अत्याचार केले. आणखी एकाने तिच्यावर अत्याचार केला मात्र अद्याप त्याची ओळख पटू शकलेली नाही. पिडित महिला ही वैद्यकीय महाविद्यालयात नागपूर येथे भरती आले.

हेही वाचा : 

Cabinet Expansion : विस्तार झाला मात्र, खातेवाटप रखडल्याची कारणे आली समोर

Exit mobile version