spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यात पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवत, शिवसेनेनी केला निषेद

शुक्रवारी पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद आणि अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. कालपासून हा व्हिडिओ व्हायरल होत असून पोलिसांकडून असा प्रकार घडला नसल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर वातावरण पेटलं असून शिवसेनेने पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. कुठला ही कायदा आणि सुवेवस्था बिगडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या निदर्शनावेळी PFIच्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्यामुळे शिवसेनेने पुण्यातीलच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवत, लाथाबुक्क्या मारत फाडला. हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या तर सुरक्षेची आणि सुव्यवस्थेची जबाबदारी घेत याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरूवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) देशभरातील कार्यालयावर छापे टाकत जवळपास १०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) वतीने अनेक ठिकाणी आंदोलन केल्याची माहिती मिळत आहे. PFI कडून पुण्यात सुद्धा आंदोलन करून पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देण्यात आल्याचा व्हीडीओ वायरल होत आहे. यानंतर आरोपींच्या चौकशीतून अनेक खुलासे होऊ लागले असून PFI कडून मुस्लीम तरूणांची दिशाभूल केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर भारताला २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं PFIचं लक्ष्य असल्याचं ATSच्या तपासातून समोर आलं आहे.

याप्रकरणानंतर अनेकांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून अनेक नेत्यांनी PFIच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आरोपींना शोधून शोधून त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तर अशा प्रकारच्या कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती कायम राहवी – दीपक केसरकर

कोरोना काळात तुम्ही रात्री… अंबादास दानवेंचा पलटवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss