शिंदे विरुद्ध ठाकरे, केंद्रीय निवडणूक आयोगात आजपासून खरी लढाई सुरू, संपूर्ण राज्याचे लक्ष

शिंदे विरुद्ध ठाकरे, केंद्रीय निवडणूक आयोगात आजपासून खरी लढाई सुरू, संपूर्ण राज्याचे लक्ष

शिवसेना कुणाची? या ठाकरे आणि शिंदेंमधल्या लढाईला आजपासून खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे. धनुष्यबाणावर दावा करण्यासाठी कागदपत्रांच्या लढाईनंतर आज प्रत्यक्ष युक्तीवाद सुरू (Shinde vs Thackeray) होण्याची शक्यता आहे. मागचे दोन महिने दोन्ही बाजूंनी लाखो कागदपत्र निवडणूक आयोगाला (Central Election Commission) सादर करण्यात आली आहेत. चिन्ह आणि शिवसेना नाव गोठवल्यानंतर आता निवडणूक आयोगाचा अंतिम निर्णय कधी येणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.

हेही वाचा : 

चंद्रकांत पाटलांकडून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची मनधरणी

शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडून शिवसेना (Shivsena) आमचीच आहे असा दावा करण्यात आला होता. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना आमचीच आहे, असा दावा केला होता. दोन्ही गटांनी धनुष्यबाण या चिन्हावर दावा केल्यामुळे हा वाद सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहचला होता. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपावलं होतं. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना चिन्हाबाबतचे कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धनुष्यबाण चिन्हाबाबतचे कागदपत्र सादर केले. आयोगाने दोन्ही गटाचे कागदपत्र तपासले असून आता धनुष्यबाण चिन्हांबाबत प्रत्यक्ष युक्तिवादाला आजपासून सुरूवात होणार आहे.

Christmas 2022 नाताळ सणात विशेष महत्व असलेला ‘ख्रिसमस ट्री’चा जाणून घ्या इतिहास

दरम्यान, निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीपुरता ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (Uddhav Balasaheb Thackeray) असं नाव मान्य केलं होतं. तसेच मशाल हे चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi shivsena) पक्ष असं नाव मान्य करत ढाल-तलवार हे चिन्ह तात्पुरता स्वरुपात दिलं होतं. आता निवडणूक आयोगाने दिलेले हेच नाव आणि चिन्हं कायम राहतील का की ठाकरे गटाला दिलासा मिळतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याचबाबत उद्या महत्त्वाची सुनावणी सुरु होणार आहे. निवडणूक आयोगात आज सुरु होणारी सुनावणी ही ठाकरे आणि शिंदे गटासाठी खरी लढाई असणार असल्याचं मानलं जात आहे. निवडणूक आयोगात आज पार पडणाऱ्या सुनावणीसाठी ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई आणि आमदार अनिल परब उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

छगन भुजबळांच्या प्रश्नाला चंद्रकांत पाटलांचं प्रतिउत्तर

Exit mobile version