spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shivjayanti 2023, यंदा शिवप्रेमी आग्र्यातील लाल किल्ल्यामध्ये साजरी करणार शिवजयंती, पुरातत्व विभागाकडून मिळाली परवानगी

शिवचरित्रात आग्र्याच्या लाल किल्याचे (Agra Fort) एक वेगळेच महत्व आहे. म्हणूनच यंदा शिवप्रेमींना आग्र्यामध्ये शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी करण्याची इच्छा होती. शिवप्रेमींनी आग्र्याच्या लाल किल्ला (Agra Fort) परिसरात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मागितली होती. पण पुरातत्व खात्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. नंतर पुरातत्व खात्यांनी लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी नाकारली होती. यामुळे आग्र्यातील सर्व शिवप्रेमी संतप्त झाले होते. कारण सांस्कृतिक कार्यक्रमांना तर आता आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास अखेर पुरातत्व खात्याने परवानगी दिली आहे. आग्रा किल्ल्यातील (Agra Fort) ‘दिवाण-ए-आम’मध्ये शिवजयंती साजरी करायला पुरातत्व खात्याने (Archaeological Survey of India) परवानगी दिली आहे. त्यामुळे आता आग्र्यातील शिवप्रेमींकडून आनंद व्यक्त केला जातो.

आग्र्यातील शिवप्रेमी संघटना अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान (Ajinkya Devgiri Pratishthan) यांनी गेल्या तीन महिन्यांपासून या परवानगी मागण्याचा प्रयत्न केला होता. यांनी नियमित पाठपुरावा देखील केला होता. पण तरीही या संस्थेकडून मागण्यात आलेल्या शिवजयंती साजरी करण्याच्या परवानगीला नाकरण्यात आले होते. तर आता त्यांना पुरातत्व विभागाकडून शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आणि शिवप्रेमी हे आग्रा किल्ल्यातील (Agra Fort) ‘दिवाण-ए-आम’मध्ये मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करणार आहेत. विनोद पाटील यांच्या अजिंक्य देवगिरी फौंडेशन आणि महाराष्ट्र सरकारकडून आग्रा किल्ला परिसरात यंदा शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विनोद पाटील यांच्या अजिंक्य देवगिरी फौंडेशन आणि महाराष्ट्र सरकारकडून आग्रा किल्ला परिसरात यंदा शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हे ही वाचा : 

व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर हार्दिक आणि नताशाचा पुन्हा एकदा पार पाडला लग्न सोहळा

भारताचा क्रिकेट संघ जगामध्ये नंबर १ ला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss