spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवराज राक्षे ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. २०२३ ची महाराष्ट्र केसरीची गदा हि शिवराज राक्षे याने पटकावली आहे.

सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. २०२३ ची महाराष्ट्र केसरीची गदा ही शिवराज राक्षे याने पटकावली आहे. पुण्यात रंगलेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत (Maharashtra Kesari Wrestling Tournament) पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने विजय मिळवला आहे. महाराष्ट्र केसरी २०२३ होण्याचा मान शिवराजने याने पटकावला आहे. महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) आणि शिवराज राक्षे यांच्यात झाली. याच अंतिम सामन्यात शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) याला अवघ्या काही मिनिटातंच थेट चितपट करत विजय मिळवला आहे.

आज पुण्यात मोठ्या उत्साहात महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा पार पडली आहे. स्पर्धेचे दिमाखदार आयोजन आणि प्रत्येक वजन गटात विजेत्यांना मिळणारी भरघोस बक्षिसे यामुळे ही स्पर्धा सुरुवातीपासूनच चर्चेत होती. संस्कृती प्रतिष्ठानचेवतीने संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा ४५ संघ आणि ९०० हून अधिक पैलवान या स्पर्धेत उतरले होते. कुस्ती शौकिनांनी देखील पुण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

महाराष्ट्र केसरी २०२३ चा अंतिम टप्प्यातील लढत आज झाली आहे. या अंतिम सामन्यासाठी पुण्याचा महेंद्र गाडकवाड आणि शिवराज राक्षे हे सज्ज झाले होते. थोड्या वेळापूर्वी माती विभातील महेंद्र गायकवाड हा विजेता झाला. पुण्याच्या महेंद्र गायकवाड याच्या सोबत सोलापूरचा सिकंदर शेख याची लढत झाली होती. त्यानंतर आता मॅट विभागातील अंतिम लढत शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये झाली. या लढतीत शिवराज राक्षे याने विजय मॅट विभागातील लढत जिंकली आहे. यातून महेंद्र गाडकवाड याने ६-४ अशा गुणांनी विजय मिळवत अंतिम लढत जिंकली. तर शिवराज याने ८-१ या फरकाने जिंकली. आता महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत महेंद्र आणि शिवराज यांच्यात झाली आहे. तर या अंतिम लढतीमध्ये शिवराज राक्षे याचा विजय झाला आहे. आणि २०२३ ची महाराष्ट्र केसरीची गदा हि पटकावली आहे.

शिवराज राक्षे हा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील राक्षेवाडीचा आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडे सराव करतो. तर महेंद्र गायकवाड हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यामधील शिरसीचा आहे. तो देखील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडेच सराव करतो. आज अंतिम लढत ही एकाच तालमीतील मल्लांमध्ये झाली आहे.

 

हे ही वाचा:

खेळाडूंना महाराष्ट्र सरकारमध्ये नोकर देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र केसरी २०२३, कोण होणार महाकेसरी? एकाच तालमीतील मल्लांमध्ये होणार चुरशीची लढत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss