spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जळगावात धक्कादायक प्रकार! भाषण सुरु असतानाच एकनाथ खडसेंच्या हातातून खेचला माईक

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या हातातून भर व्यासपीठावरुन माईक खेचल्याचा प्रकार समोर आलाय, त्यामुळं काहीकाळ सभेत गोंधळ उडाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या हातातून भर व्यासपीठावरुन माईक खेचल्याचा प्रकार समोर आलाय, त्यामुळं काहीकाळ सभेत गोंधळ उडाला होता.

जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची उपस्थिती होती. मेळाव्यात एकनाथ खडसेंनी भाषण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांची नावे घेतली. यासाठी खडसे यांच्या हातात एक चिठ्ठीही होती. त्यानुसार ते मान्यवरांची नावे घेत होते. मात्र त्याचवेळी गर्दीतून अचानक एक कार्यकर्ता थेट उठला व त्याने बोलत असलेल्या एकनाथ खडसेंच्या हातातून माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे व्यासपीठावर मोठा गोंधळ उडाला.

व्यासपीठावर बसलेल्या एका पदाधिकाऱ्याने माईक हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्याला पकडून बाजूला नेले. काही वेळ कोणालाच नेमकं काय होत आहे तेच कळलं नाही. यानंतर भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ खडसेंनी माईक हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्याला टोले लगावत चिमटे काढले. दरम्यान, माईक हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यास शांत करत बाजूला नेले जात असताना तो ‘आम्ही एवढ्या लांबून आलो तरी आमचे नाव घेत नाहीत’ असं बडबडत असल्याचे आढळून आले. त्यामुळे खडसेंनी व्यासपीठावर काही लोकांची नावे घेतली नसल्याने या कार्यकर्त्याने खडसेंच्या हातातून माईक हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.

जामनेर इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हिजेएनटी मेळाव्यात हा प्रकार घडला असून ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. यावेळी आपल्या भाषणात खडसे म्हणाले, जसजशी संध्याकाळ होते तसतशी घरी जायची घाई होते. एका बाजूला घरी जायचं असतं तर दुसऱ्या बाजूला तिकडं जायचं असतं. हम तो बंजारा है. हमने तो अभीतक नहीं छोडी, असं त्यांनी सांगताच कार्यकर्त्यांत चांगलाच हशा पिकाला.

हे ही वाचा :

सावरकरांवर टीका, राजकारण तापलं; भर थंडीत हजारो मनसैनिक शेगावच्या दिशेने, मुद्दा काय?

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू

मनसे कोण?; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल्यांनी लगावला टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss